शेतकऱ्यांसाठी बातमी सोयाबीन बाजर भाव | Soybean Market Rate

शेतकऱ्यांसाठी बातमी सोयाबीन बाजर भाव | Soybean Market Rate
रजपुताचां सोनेरी महल

Soybean Market Rate सोयाबीन बाजर भाव

पुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीनचे दर (Soybean Rate) काहीसे नरमले होते. सोयातेलाच्या दरातील तेजीही आज थांबली होती. मात्र देशात प्रक्रिया प्लांट्सची (Soybean Processing Plant) खरेदी वाढल्यानं दरातील वाढ कायम होती. असं असूनही शेतकऱ्यांनी बाजारातील सोयाबीनची आवक (Soybean Arrival) कमी केली.

आंतरराष्ट्रीय पातळीवर सोयाबीन बाजारात कालपासून काहीशी स्थिरता आली. सोयाबीन आणि सोयातेलाचे दर काहीसे कमी झाले असून सोयापेंडचे दर किंचित सुधारले. अमेरिकेतील सोयाबीनची काढणी आता मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली. तर ब्राझील आणि अर्जेंटीना या महत्वाच्या सोयाबीन उत्पादक देशांना सलग तिसऱ्या वर्षी ला निना स्थितीचा फटका बसतोय.

ब्राझीलमधील माटो ग्रासोसह महत्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये कमी पावासामुळे पेरणीला अडथळा येतोय. तर अर्जेंटीनातही काही भागात पेरणीसाठी पोषक स्थिती नाही. याचा परिणाम सोयाबीनची पेरणी आणि उताऱ्यावर होऊ शकतो, असा अंदाज काहीजण व्यक्त करत आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयातेलाच्या दरात जवळपास अर्ध्या टक्क्याची घट दिसत होती. सोयाबीनचे वायदे १४.४४ डाॅलर प्रतिबुशेल्सने पार पडले. तर सोयातेलाचे व्यवहार ७५.८८ सेंट प्रतिपाऊंडने झाले. सोयाबीन आणि सोयातेलाचे वायदे कालपासून काहीसे स्थिर दिसत आहेत. शुक्रवारपर्यंत दोन्ही मालाच्या किमती सातत्याने वाढत होत्या. मात्र सोमवारपासून दरात चढ-उतार सुरु आहेत. असं असलं तरी आज सोयापेंडच्या दरात किंचित सुधारणा झाली होती. सोयापेंडचे वायदे ४१९.५४ डाॅलर प्रतिटनाने पार पडले.

देशातील बाजारात आजही सोयाबीनच्या दरात ५० ते १०० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. देशातील सोयाबीन दर मागील आठवड्याच्या मध्यापासून सुधारत आहेत. सोयाबीनचा सरासरी दर ४ हजार ९०० रुपयांवरून ५ हजार ५०० रुपयांपर्यंत वाढलाय. आज महाराष्ट्रात सोयाबीनला ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान सरासरी दर मिळाला. तर लातूर बाजारात सर्वाधिक ५ हजार ९०० रुपयाने व्यवहार झाले. दुसरीकडे मध्य प्रदेशातील बाजारातील दर ५ हजार ३०० ते ५ हजार ५५० रुपयांच्या दरम्यान होते.

प्रक्रिया प्लांट्सची खरेदी वाढल्यानं बाजारतील दर सुधारले आहेत. दर वाढत असल्यानं शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री कमी केल्याचं दिसतं. सध्या बाजारातील आवक अपेक्षेपेक्षा कमी दिसतेय. तर दुसरीकडे गरज असलेले शेतकरी वाढलेल्या दरात मालाची विक्री दरत आहेत. सध्या दर वाढत असल्यानं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच सोयाबीनची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.

https://youtu.be/cMoCmM6gdao
साईबाबांच्या काळातील जुनी शिर्डी
<

Related posts

Leave a Comment