ठाणे : माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड हर हर महादेव चित्रपटाच्या वादानंतर पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. गेल्या आठवडाभरात जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेला हा दुसरा गुन्हा असून यावेळी एका 40 वर्षीय महिलेच्या विनयभंगाचे प्रकरण समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. A molestation case was filed against former minister Jitendra Awad following a complaint by a 40-year-old BJP woman office-bearer
व्हिडीओ व्हायरल झाला. तपासामध्ये व्हिडीओ जप्त करून सत्यता पडताळण्यात येईल. त्यानुसार पुढची कारवाई करण्यात येईल. 40 वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. विनयभंगाच्या अनुषंगानं व्हिडीओ क्लीप सादर केली आहे. सोशल मीडियावरही त्याची व्हिडीओ क्लीप फिरत आहे. त्याची सत्यता पुरावा म्हणून तपासली जाईल, असंही ठाणे पोलीस म्हणाले. A molestation case was filed against former minister Jitendra Awad following a complaint by a 40-year-old BJP woman office-bearer
मुंब्रा येथे शांतता राहण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाचे जवान दाखल झाले आहेत. स्थानिक पोलीस, जादा कुमक तसेच मुंब्रा येथे पोलीस तैनात करण्यात आली आहे. मुंब्रा हद्दीत ठिकठिकाणी घटना घडल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. ज्या घटना घडल्या आहेत, त्याबाबत चौकशी करण्यात येईल. त्यानंतर संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक अजित पवार , सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद
कायदा सुव्यवस्था बंदोबस्ताकडं लक्ष्य आहे. तपास प्रक्रिया सुरू आहे. थेट जाऊन जबाब नोंदविण्यात आला नाही. आज सकाळी तक्रारदार महिलेविरुद्ध एक तक्रार शिवा जगताप यांनी नोंदविली आहे. यानुसार, दहा-पंधरा दिवसांपूर्वीची घटना असलेलं सांगितलं. त्यावरून मुंब्रा येथे गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार महिसेसह आणखी एका व्यक्तीचा त्यात समावेश आहे, असं मुंब्रा पोलिसांनी सांगितलं.