Maharashtra Goverment | कृषी विभागाच्या वतीने फळबाग लागवडी सह इतर लाभाच्या अनुदान योजना चालू
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सलग फळबाग लागवड, बांधावर फळबाग लागवड,नाडेप खत उत्पादन युनिट, गांडूळ खत उत्पादन युनिट योजना चालू झाली आहे
तरी पात्र सर्व शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.
१) ७/१२ उतारा
२) ८ अ उतारा (एकूण क्षेत्र २ हेक्टर पेक्षा कमी)
३) आधार कार्ड
४) राष्ट्रीय बँकेचे बँक पासबुक
५) जाँब कार्ड
६) ग्रामपंचायत ठराव
सलग फळबाग लागवडीस १ हेक्टर क्षेत्रासाठी खालील प्रमाणे अनुदान मिळेल.
आंबा कलमे – अनुदान 219634/-
चिक्कू कलमे – अनुदान 158890/-
पेरू कलमे – अनुदान 222665/-
डाळिंब कलमे – अनुदान 243135/-
लिंबू, संत्रा,मोसंबी – अनुदान 148873/-
सिताफळ कलमे – अनुदान 138542/-
बांधावरील फळबाग लागवडीस 1 हेक्टर क्षेत्रावरील एकुण 20 झाडांसाठी खालील प्रमाणे अनुदान मिळेल.
आंबा कलमे – अनुदान 32252/-
नारळ रोपे – अनुदान 21442/-
पेरू कलमे – अनुदान 10182/-
सिताफळ कलमे – अनुदान 6888/-
जांभूळ कलमे – अनुदान 19220/-
तसेच
नाडेप खत उत्पादन युनिट साठी एकूण अनुदान 10746/-
गांडूळ खत उत्पादन युनिट साठी एकूण अनुदान 11520/-
वरील प्रमाणे योजना चालू आहे सदर योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा हि विनंती. आपल्या ग्रामपंचायती मधील रोजगार सेवक किंवा गावच्या सहाय्यक कृषि अधिकारी ( कृषि सहाय्यक) यांचेशी संपर्क करा
हे ही लेख वाचा ————-
- बीडमधील उमाकिरणचे अल्पवयीन विद्यार्थिनीवर वाईट किरण लैंगिक छळ विनयभंग, पालकांमध्ये संतापबीड, महाराष्ट्र: बीडमधील उमाकिरण खासगी शिकवणी क्लासेस (Umakiran Coaching Classes) सध्या एका गंभीर वादाच्या केंद्रस्थानी आहे.
- अंतराळात जाणारे दुसरे भारतीय शुभांशु शुक्ला कोण आहेत ?Axiom-4 मिशनसह अंतरिक्षात इतिहास रचणारे पहिले भारतीयमहाराष्ट्र व्हॉईस, २५ जून २०२५ भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे, कारण भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशु
- महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; कोकण, पुणे, नाशिकसह अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारामहाराष्ट्र व्हॉइस, २६ जून २०२५ महाराष्ट्रात मान्सूनने जोर धरला असून, राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी
- शैक्षणिक दबावाचा बळी! नीट चाचणीत कमी गुण पडल्याने वडिलांनी मारहाण केली; बारावीची हुशार विद्यार्थिनी साधना भोसले हिचा मृत्यूSangli Tragedy: 12th-Grade Girl Dies After Beating by Father Over NEET Mock Test Scores सांगली जिल्ह्यातील
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच भेट दिलेला क्रोएशिया हा देश कुठे आहे? काय आहे त्याची ऐतिहासिक माहितीWhere is Croatia, the country that Prime Minister Narendra Modi recently visited? What is its historical