मराठा आरक्षणाच्या Maratha Reservation मागणीसाठी येत्या 16 तारखेला कोल्हापुरातून मोर्चाची हाक दिल्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना जाहीरपणे भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला आणि जबाबदारी स्वीकारा, असे संभाजीराजे यांनी या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता राज्यातील मराठा आमदार आणि खासदार मराठा आरक्षणासंदर्भात काही निर्णायक भूमिका घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Sambhajiraje Chhatrapati ask Maratha leaders to speak up for Reservation)
वादळा पुर्वीची ही शांतता, समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला आणि जबाबदारी स्वीकारा !
काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे यांनी नाशिकच्या पत्रकारपरिषदेत मराठा लोकप्रतिनिधींना इशारा दिला होता. मराठा आरक्षणासंदर्भात मी भूमिका मांडल्यानंतर राठा आमदार आणि खासदारांनी माझं-तुझं केलं तर बघा, असा इशाराही संभाजीराजे छत्रपती यांनी दिला होता. त्यामुळे आता संभाजीराजे यांच्या फेसबुक पोस्टमुळे मराठा लोकप्रतिनिधींवरील दबाव वाढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘संभाजी छत्रपती आजपर्यंत मॅनेज झाला नाही, गोळी असो की तलवार, पहिला वार माझ्यावर’
गेल्यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात मराठा आरक्षणाच्या नाशिकमधील सभेत बोलताना संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यावेळी उपस्थितांनी त्यांना मराठा आंदोलनाचे नेतृत्व करण्याची विनंती केली होती. तेव्हा संभाजीराजे यांनी म्हटले होते की, छत्रपती संभाजी म्हणून नाही तर मराठा समाजाचा सेवक म्हणून इथे आलोय. कुटुंबप्रमुख म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. नेतृत्व करण्याचं मी नम्रपणे टाळतो, पण शेवटपर्यंत लढाई लढणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून मी तुमच्यासोबत राहणार.
राज्यसभेत मराठा समाजाचे नेते बोलत नव्हते. मराठा समाजासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय. संभाजी छत्रपती आजपर्यंत मॅनेज झालेला नाही. मॅनेज झाला तर छत्रपतींचा वंशज म्हणून घेण्याची लायकी नाही. अंगावर पहिला वार माझ्यावर होऊ दे. गोळीचा होऊ दे की तलवारीचा होऊ दे. संभाजी छत्रपती ही मोहीम घ्या, असं सांगा, मी समाजाचा सेवक म्हणून मी जाईल, असे संभाजीराजे यांनी म्हटले होते.
— हे ही वाचा—
- मनोज जरांगे यांचे नऊ दिवसांपासून चालु असलेले उपोषण थांबवले; आचारसंहिता पर्यंत सरकारला वेळमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून अंतरवली सराटीमध्ये उपोषण करणाऱ्या मनोज जरंगे यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे…
- बीड मध्ये निवडणूका नंतर वंजारी मराठा जातीय तणाव वाढला; मनोज जरांगे पाटील यांचा मुंडे बहीण-भावाला सवालबीडमधील नांदूरघाट गावात बुधवारी (१५ मे) रात्री झालेल्या दगडफेकीच्या घटनेने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या दगडफेकीच्या घटनेत अनेक ग्रामस्थ…
- Maratha Reservation-सगेसोयरे आद्यादेश अंमलबजावणी की स्वंतत्र आरक्षण; सस्पेन्स वाढला, आंदोलन थांबणार की अजून चिघळणार, मुख्यमंत्री यांच्या प्रेस नंतर जरांगे यांची प्रेसमुंबई व अंतरवली सराटी|आज सकाळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या पत्रकार परिषदेनंतर तात्काळ जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणावर सस्पेन्स वाढणार…
- Maratha Reservation| मी मेलो तर.. टेन्शन वाढलं, जरांगे पाटील यांची तब्येत नाजूक, पुन्हा उपचार नाकारलेआंतरवली सराटी (जि. जालना) | मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर करावं या मागणीसाठी मनोज…