Maratha Reservation Manoj Jarange| मुंबईच्या वेशीवर तडजोडीचा डाव; सगेसोयरे अध्यादेशावर मनोज जरांगे ठाम, त्याशिवाय माघार नाही

Maratha Reservation Manoj Jarange| मुंबईच्या वेशीवर तडजोडीचा डाव; सगेसोयरे अध्यादेशावर मनोज जरांगे ठाम, त्याशिवाय माघार नाही

नवी मुंबई : ( प्रतिनिधी) : कुणबी च्या 54 लाख नाही 57 लाख नोंदी मिळालेल्या असून आपल्या भाऊबंदालाची नोंद सापडल्यावर आपणही अर्ज करणे गरजेचे आहे. 37 लाख प्रमाणपत्रे वाटप केल्याचे सरकार सांगत आहे. मात्र सग्या- सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढा त्याच सोबत मोफत शिक्षण करा आणि आरक्षणाचा प्रश्न मिटेपर्यंत लवकर भरती करणार नाही हे स्पष्ट करा याशिवाय आंदोलन थांबणार नाही असे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. आम्ही आझाद मैदानावर जाणारच आहोत आरक्षण मिळाले तर गुलाल उधळायला जाऊ, आरक्षण नाही मिळाले तर आंदोलन करायला जाऊ, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. Maratha Reservation Manoj Jarange| Compromise at the gates of Mumbai; Manoj Jarange insists on Sagesoyre Ordinance, no retreat except that


मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी मरत जागा की पाटील मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी पदयात्रा घेऊन निघाले आहेत. त्यांच्या पदयात्रेसोबत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून लाखो मराठा कार्यकर्ते तरुण सहभागी झाले आहेत. आज शुक्रवारी नवी मुंबई (वाशी) येथे सरकारच्या प्रतिनिधींनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली तसेच मागण्या मान्य केल्याचे काही कागदपत्रे दिली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी वाशीतील शिवाजी चौकात उपस्थित मराठा बांधवांसी जाहीर सभेतून संवाद साधला.

सरकारने दिलेल्या कागदपत्राची जाहीरपणे लोकांना माहिती दिली. मनोज जरांगे पाटील म्हणाले की 54 लाख नव्हे तर 57 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या असून त्यातील सदतीस लाख प्रमाणपत्रे वाटप केली असल्याचे शासन सांगत आहे. कोणाला 37 लाख प्रमाणपत्रे वाटप केली त्याची यादी आपण मागवली आहे. महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना ही यादी मी पाठवणार आहे. राहिलेली प्रमाणपत्र तातडीने देत असल्याचे सांगून त्यांच्या वंशावळ जुळवण्याचे काम सुरू आहे असे सरकारचे लोक सांगत आहेत.


सरकारने नियुक्त केलेली शिंदे समिती कायम ठेवून राहिलेल्या लोकांच्या नोंदी सापडण्याचे काम करावे अशी मागणी मी केलेली आहे. नोंद मिळाली आहे अशांच्या प्रमाणपत्राच्या आधारावर ज्यांची कुणबी नोंद मिळाली नाही अशा सग्या सोयरयांना प्रमाणपत्रे द्यावीत. त्यांच्याकडे नोंद नाही त्यांना त्यांच्याकडून नोंद आहे त्यांनी माझा सोयरा आहे असं शपथपत्र करून दिल्यानंतर त्याला प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी असून त्याबाबतचा शासनाने तातडीने अध्यादेश काढावा. त्याबाबत उद्या सकाळपर्यंत वेळ दिलेली आहे. मराठ्यांना मोफत शिक्षण द्यावे. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत सरकारने नोकर भरती थांबवावी. सग्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश आज दिला तर गुलाल उधळायला आझाद मैदानावर जाणार. नाही दिलं तर उपोषण करण्यासाठी जाणार असे जरांगे पाटील यांनी ठासून सांगितले.

आंदोलनाच्या काळात जर आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांनी झाडून पुसून मुंबईला याव असे महाराष्ट्रातील मराठा समाजाला आवाहन करत मुंबईतील कोणत्याही आपल्या बांधवांना,ज्ञकोणालाही त्रास होऊ द्यायचा नाही. काही झालं तरी आरक्षण घेतल्याशिवाय मात्र माघारी जायचं नाही असा ठाम निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी लोकांसमोर बोलताना व्यक्त केला.

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice