शिवराज्यदिना निमित्त भगवाध्वज उभारण्यास विरोध. आदेश रद्द करा. अथवा सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेईल.

शिवराज्यदिना निमित्त भगवाध्वज उभारण्यास विरोध. आदेश रद्द करा. अथवा  सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेईल.

मुंबई :- 04 जून : रविवारी असलेल्या शिवराज्याभिषेक दिन (Shivrajyabhishek Din) सोहळ्याच्या मुद्द्यावरून एक नवा वाद समोर आला आहे. संपूर्ण राज्यात शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी ग्रामविकास विभागानं ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांमध्ये हा सोहळा साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. यादिवशी भगवा ध्वज (Orange Flag) असलेली गुढी उभारली जाणार आहे. पण त्याला अ‍ॅडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी (Advocate Gunratna Sadavarte) विरोध केला आहे. त्यामुळं आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.


संपूर्ण राज्यात 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिना साजरा होणार आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचे आदेश ग्रामविकास विभागानं दिले आहेत. यासाठी एक विशेष ध्वजही तयार करण्यात येत आहे. शिवशक, राजदंड आणि स्वराज्याची गुढी उभी करण्यात येणार आहे. गुढीला भगवा स्वराज्य ध्वजसंहिता लावण्यात येणार आहे.


दरम्यान, सरकारच्या या आदेशाला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध दर्शवला आहे. शासकीय कार्यालयांमध्ये तिरंग्याच्या व्यतिरिक्त कोणताही ध्वज लावण्यास परवानगी नसते. हा प्रकार देशाच्या एकसंधतेचा अवमान करण्याचा आणि संविधानाची पायमल्ली करणारा असल्याचं सदावर्ते यांनी म्हटलं आहे. त्यामुळं हा आदेश रद्द करावा आणि तो काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तशीच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सदावर्तेंनी केली आहे. हा प्रकार म्हणजे देशद्रोह असून जर हा आदेश मागं घेतला नाही, तर सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेईल असे स्टेटमेंट गुणरत्न सदावर्ते यांनी केले .

<

Related posts

Leave a Comment