मुंबई :- 04 जून : रविवारी असलेल्या शिवराज्याभिषेक दिन (Shivrajyabhishek Din) सोहळ्याच्या मुद्द्यावरून एक नवा वाद समोर आला आहे. संपूर्ण राज्यात शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी ग्रामविकास विभागानं ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांमध्ये हा सोहळा साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. यादिवशी भगवा ध्वज (Orange Flag) असलेली गुढी उभारली जाणार आहे. पण त्याला अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी (Advocate Gunratna Sadavarte) विरोध केला आहे. त्यामुळं आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
संपूर्ण राज्यात 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिना साजरा होणार आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचे आदेश ग्रामविकास विभागानं दिले आहेत. यासाठी एक विशेष ध्वजही तयार करण्यात येत आहे. शिवशक, राजदंड आणि स्वराज्याची गुढी उभी करण्यात येणार आहे. गुढीला भगवा स्वराज्य ध्वजसंहिता लावण्यात येणार आहे.
दरम्यान, सरकारच्या या आदेशाला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध दर्शवला आहे. शासकीय कार्यालयांमध्ये तिरंग्याच्या व्यतिरिक्त कोणताही ध्वज लावण्यास परवानगी नसते. हा प्रकार देशाच्या एकसंधतेचा अवमान करण्याचा आणि संविधानाची पायमल्ली करणारा असल्याचं सदावर्ते यांनी म्हटलं आहे. त्यामुळं हा आदेश रद्द करावा आणि तो काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तशीच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सदावर्तेंनी केली आहे. हा प्रकार म्हणजे देशद्रोह असून जर हा आदेश मागं घेतला नाही, तर सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेईल असे स्टेटमेंट गुणरत्न सदावर्ते यांनी केले .
- जंतर-मंतरवर CJP चा जोरदार आंदोलन; महाराष्ट्रातून मोठा सहभाग, धरमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीनवी दिल्ली/पुणे, १९ जुलै २०२६: कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या युवा आंदोलकांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर NEET पेपर लीक आणि शिक्षण व्यवस्थेतील… Read more: जंतर-मंतरवर CJP चा जोरदार आंदोलन; महाराष्ट्रातून मोठा सहभाग, धरमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
- महाराष्ट्रात पावसाचा धक्कादायक असमतोल! एकाच राज्यात पूर आणि दुष्काळ एकत्र?Shocking imbalance in rainfall in Maharashtra! Flood and drought together in the same state? चालू मान्सून हंगामात महाराष्ट्रात कमालीची टोकाची… Read more: महाराष्ट्रात पावसाचा धक्कादायक असमतोल! एकाच राज्यात पूर आणि दुष्काळ एकत्र?
- बीडमध्ये खळबळ: विलास घुले हत्या प्रकरणाला वेगळे वळण; खासदार पुत्राची ४ तास चौकशी तर महिलेच्या दाव्याने नवा ट्विस्ट!बीड: केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले हत्या प्रकरणाने आता अत्यंत गंभीर आणि नाट्यमय वळण घेतले आहे. या… Read more: बीडमध्ये खळबळ: विलास घुले हत्या प्रकरणाला वेगळे वळण; खासदार पुत्राची ४ तास चौकशी तर महिलेच्या दाव्याने नवा ट्विस्ट!
- अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण लाच प्रकरणात रंगेहात अटक; महसूल विभागात खळबळछत्रपती संभाजीनगर (स्पेशल रिपोर्ट) : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याचे तहसीलदार विजय लक्ष्मण चव्हाण यांना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ६… Read more: अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण लाच प्रकरणात रंगेहात अटक; महसूल विभागात खळबळ
- पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यूधनिवारी (पालघर) – १९ मे २०२६ मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धनिवारी गावाजवळ (दहानू तालुका, पालघर जिल्हा) सोमवारी सायंकाळी साखरपुड्याच्या वऱ्हाडातील भरलेल्या… Read more: पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यू
