सभागृहात गोंधळ, १२ आमदार निलंबित |Misconduct in the Legislative Assembly, 12 MLAs suspended.

सभागृहात गोंधळ, १२ आमदार निलंबित |Misconduct in the Legislative Assembly, 12 MLAs suspended.

Online Team : सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचे एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलेले आहे. Misconduct in the Legislative Assembly, 12 MLAs suspended पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. या 12 आमदारांनी तालिका अध्यक्षांना धक्का-बुक्की करत शिवीगाळ केली, असा आरोप तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केला आहे. 


निलंबन करण्यापूर्वी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आपली बाजू मांडली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली बाजू मांडली.  देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली की, अशी कारवाई करू नका, मात्र त्यानंतरही १२ आमदारांवर कारवाई करण्यात आली. Misconduct in the Legislative Assembly, 12 MLAs suspended

तालिका अध्यक्षांसोबत गैरवर्तन केलेल्या आमदारांच्या निलंबनाचा ठराव अनिल परब यांनी मांडला आणि तो मंजूर करण्यात आलेला आहे. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. सभागृहात हा ठराव एकतर्फी मांडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच विरोधी पक्षाची सभागृहातील संख्या कमी करण्याचा प्रयत्न आहे, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. दरम्यान, हे सर्व 12 आमदार राज्यपालांच्या भेटीला गेलेले आहे. Misconduct in the Legislative Assembly, 12 MLAs suspended

<

Related posts

Leave a Comment