पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजनेचा लाभ घ्या- तहसिलदार राकेश गिड्डे

पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजनेचा लाभ घ्या- तहसिलदार राकेश गिड्डे

माहूर– शेतीमधे कमी होणाऱ्या मनुष्यबळामुळे कृषी क्षेत्रात यंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. शेतामधे पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामुग्री शेतापर्यंत नेण्यासाठी व शेतीमाल बाजारात पोहोचविण्यासाठी शेताला बारमाही शेतरस्त्याची गरज लक्षात घेऊन शासनाकडून पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसिलदार राकेश गिट्टे यांनी केले आहे .


पानोळा ग्राम पंचायतच्या वतीने आयोजित दोन किलोमिटर पाणंद रस्त्याचे भुमिपुजन करतांना ते बोलत होते. तालुक्यातिल शेतकऱ्यांनी शेत रस्त्याबाबत पश्चिम महाराष्ट्रातिल शेतकर्यांचा आदर्श घ्यावा असेही त्यांनी सांगितले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्रीमती कमलाबाई कुमरे तर प्रमुख पाहूणे म्हणुन मंडळ अधिकारी पातकुंडे, मंडळ अधिकारी सुगावे, रोजगार हमी योजनेचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एस. पी. राठोड, ग्राम विस्तार अधिकारी पप्पुलवाड एस. एल. उपसरपंच सुचिता पंकज चव्हाण, पोलिस पाटील प्रकाश पवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शेषराव राठोड, ग्रा.प सदस्य मेघराज आडे, सिमा शंकर आडे, साकरोबाई कुडमेते, रमेश कुडमेते शितल बाळू कुडमेते, संभा रामजी कुरसंगे पत्रकार नितेश बनसोडे, पत्रकार पंडीत धुप्पे यांची उपस्थिती होती.

उद्घाटन समारंभ

पाणंद रस्ता योजनेसाठी पाठपुरावा करणारे रमेश चव्हाण यांचा तहसिलदार यांनी सत्कार केला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष अरविंद जाधव, संजय कुमरे, शंकर आडे, बाळू कुडमेते, पंकज चव्हाण, अविनाश पवार, सुधिर पवार, सुनिल पवार, राजु राठोड यांनी परीश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रविण राठोड यांनी तर आभार प्रदर्शन रमेश चव्हाण यांनी केले.


कार्यक्रमाला माजी सरपंच वसंत कुडमेते प्रदीप पवार, यादव राठोड, विष्णु आडे, नामदेव जाधव, भावराव राठोड, सुधाकर आडे, देविदास राठोड, विजय राठोड, गोविंद राठोड यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

<

Related posts

Leave a Comment