केंद्रीय गृह राज्‍यमंत्री अजय मिश्राच्या मुलाने लखीमपूर खेरी शेतकरी आंदोलनातील शेतकर्‍यांच्या अंगावर घातली गाडी, हिंसाचारात मृतांचा आकडा ९ वर

केंद्रीय गृह राज्‍यमंत्री अजय मिश्राच्या मुलाने लखीमपूर खेरी शेतकरी आंदोलनातील शेतकर्‍यांच्या अंगावर घातली गाडी, हिंसाचारात मृतांचा आकडा ९ वर

“Union minister’s son crushes farmers under car”

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीमध्ये आज शेतकरी आंदोलना दरम्यान एक मोठी घटना घडली. उत्तर प्रदेशचे उप मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे लखीमपूर खेरीमध्ये येणार होते. यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्र टेनी हे देखील त्या ठिकाणी येणार होते. यावेळी शेतकऱ्यांनी मंत्र्यांसमोर निषेध करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र यांच्या मुलाचा आणि शेतकऱ्यांचा मोठा संघर्ष झाला. या संघर्षात जवळपास चार शेतकऱ्यांसह 9 जणांचा मृत्यू झाला.

केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्र यांच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालून शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला, तसेच या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून, अनेक शेतकरी जखमी झाले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. लखीमपूर खेरीमध्ये घडलेल्या या घटनेनंतर वातावरण चिखळलं असून, त्याठिकाणी जाळपोळ झाल्याचेही समोर आले आहे.


उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे हेलिपॅडवर सुरू झालेल्या शेतकरी धरणे आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागले. यावेळी अनेक गाड्यांची मोडतोड करण्यात आली. काही गाड्या पेटवण्यात आल्या. या हिंसाचारात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे.Union Home Minister Ajay Mishra’s son raises vehicle on Lakhimpur Kheri Shetkari Dharne Andolan farmers, death toll rises to 9

आशीष मिश्रा याच्‍यावर खुनाचा गुन्‍हा
याप्रकरणी केंद्रीय गृह राज्‍यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशीष मिश्रा याच्‍यावर खुनाचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. आंदोलक शेतकर्‍यांवर गाडी घालून त्‍यांची हत्‍या केल्‍याचा आरोप त्‍याच्‍यावर आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी आणि उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांचे हेलिकॉप्टर उतरणार असलेल्या हेलिपॅडवर शेतकर्‍यांनी रविवारी सकाळपासून कब्जा केला होता. दुपारी पावणेतीन वाजता दोन्ही नेत्यांचा काफिला तिकोनिया चौकातून गेला तेव्हा शेतकरी काळे झेंडे घेऊन त्यांच्या दिशेने धावून आले. Union Home Minister Ajay Mishra’s son raises vehicle on Lakhimpur Kheri Shetkari Dharne Andolan farmers, death toll rises to 9

यादरम्यान अजय मिश्रा यांचा मुलगा अभिषेक मिश्रा ऊर्फ मोनू याने आपली गाडी शेतकर्‍यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेतकर्‍यांच्या संतापाचा कडेलोट झाला. शेतकर्‍यांनी मोनू यांच्या गाडीसह अनेक गाड्यांची जाळपोळ, तोडफोड केली. या हिंसाचारातील मृतांचा आकडा ९ वर गेला आहे. “Union minister’s son crushes farmers under car”

=========================================================================================

<

Related posts

Leave a Comment