नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी समग्र शिक्षा 2.0 ला मंजुरी दिली. समग्र शिक्षासाठी किंमत 2.94 लाख कोटी रुपयांची तरतुद करण्यात आलीय. ही योजना 2021 पासून मार्च 2026 पर्यंत लागू असेल. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत समग्र शिक्षा 1 एप्रिल 2021 पासून 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आली, असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समग्र शिक्षा 2.0 वर 2.94 लाख कोटी रुपये खर्च केले जातील. 2.94 लाख रुपयांमध्ये केंद्राचा हिस्सा 1.85 लाख कोटी रुपये असेल. Union Cabinet decisions samagra shiksha mission extended till 2026
समग्र शिक्षाच्या दुसऱ्या टप्प्यात 11.6 लाख सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळा, 15.6 कोटी मुले आणि 57 लाख शिक्षक कक्षेत येतील. समग्र शिक्षाच्या दुसऱ्या टप्प्यात पुढील काही वर्षांमध्ये, बाल वाटिका, स्मार्ट वर्गखोल्या, प्रशिक्षित शिक्षकांची टप्प्याटप्प्याने शाळांमध्ये व्यवस्था केली जाईल आणि पायाभूत सुविधा, व्यावसायिक शिक्षण आणि सर्जनशील शिकवण्याच्या पद्धती विकसित केल्या जातील, असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले. Union Cabinet decisions samagra shiksha mission extended till 2026
समग्र शिक्षाच्या विस्तारामध्ये शाळांमध्ये सर्वसमावेशक आणि आनंदी वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. शाळांमध्ये एक भाग म्हणून वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थ्यांच्या बहुभाषिक गरजा आणि मुलांच्या विविध शैक्षणिक क्षमतांच्या विकासासाठी लक्ष देण्यात येईल. शिक्षण मंत्री म्हणाले की, या अंतर्गत टप्प्याटप्प्याने प्ले स्कूल उभारण्याबरोबरच शैक्षणिकसाहित्य तयार केले जाईल, तसेच स्मार्ट वर्गखोल्यांचीही व्यवस्था केली जाईल. Union Cabinet decisions samagra shiksha mission extended till 2026
समग्र शिक्षाची व्याप्ती वाढविताना, विशेष सहाय्याची गरज असलेल्या मुलींसाठी स्वतंत्र मानधनाची तरतूद, शिकण्याच्या प्रक्रियेवर देखरेख, शिक्षकांची क्षमता वाढवणे आणि प्रशिक्षण कार्य यावर विशेष लक्ष दिले जाईल, असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं. समग्र शिक्षा अंतर्गत कस्तुरबा गांधी कन्या शाळांची व्याप्ती आणि श्रेणीसुधारणे आणि ‘सर्व’ रिपोर्ट कार्डची प्रक्रिया राबवण्यावर भर दिला जाईल. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत समग्र शिक्षाला मुदतवाढ देण्यात येत असल्याचं धर्मेंद्र प्रधान म्हणाले. Union Cabinet decisions samagra shiksha mission extended till 2026
====================================================================================================
- पाकिस्तानवर ड्रोन हल्ले, नऊ शहर बाधित, रडार सिस्टीम उध्वस्त- आंतकियोसे का बदला ऑपरेशन सिंदूर जारी है..!पाकिस्तानात ड्रोन हल्ले: तणाव वाढला आज, गुरुवार, ८ मे २०२५ रोजी, “ऑपरेशन सिंदूर” नंतर…
- Operation Sindoor | टारगेट कसे सेट केले ऑपरेशन सिंदूर बद्दल तुम्हाला हे माहित आहे का?Operation Sindoor सविस्तर माहिती ऑपरेशन सिंदूर हे भारतीय सशस्त्र दलांनी बुधवार, ७ मे २०२५…
- Maharashtra Local Body Election| चार महिन्यात निवडणुका घ्या कोर्टाने सुनवले, स्थानिक स्वराज्य संस्थांत निवडणूकाचा धुराळा उडणारस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. (Maharashtra Local Body Election )कारण येत्या…
- Cast Census In India | जात जनगणना म्हणजे काय आणि ती भारतासाठी का महत्त्वाची आहे?नवी दिल्ली: १८८१ ते १९३१ पर्यंत ब्रिटिश राजवटीत जातींची गणना ही जनगणनेचा एक नियमित…
- “दहशतवाद्यांना शस्त्रे कुठून, सेना तुमच्या नियंत्रणात नाही का?” पहलगाम हल्ल्यानंतर मोदींचे जुने भाषण क्लिप व्हायरलNMV Reporter – “सेना तुमच्या नियंत्रणात नाही का? दहशतवाद्यांना शस्त्रे कुठून मिळतात? ते देशात…