UIDAI ने mAadhaar App चे नवीन अपडेट आणले | चिंता मिटली; घरबसल्या करा बदल App वरुन

UIDAI ने mAadhaar App चे नवीन अपडेट आणले | चिंता मिटली; घरबसल्या करा बदल App वरुन

कुठलंही सरकार काम करायचं म्हटलं की, ‘आधार कार्ड’ आलंच! Aadhaar आधार कार्डाशिवाय कुठलंच काम आता होत नाही, इतकं नक्की. आपल्या मोबाईलच्या साध्या सिमकार्ड खरेदी पासून ते आता अगदी कोरोना लसीकरणापर्यंत ‘आधार कार्ड’च आपल्याला आधार ठरतं. कुठलीही सरकारी योजना आधार कार्डाशिवाय पूर्णच होत नाही. आधार कार्ड म्हणजे आपली अधिकृत ओळख असते.

 ठिकठिकाणी आपल्याला आधार कार्ड लागतंच! ते जर हरवलं अथवा गहाळ झालं तर आपली बरीचशी आवश्यक अशी कामे निश्चितपणे अडतात. या आधार कार्डमध्ये काही चुका असल्या तरीही बराच घोळ होतो. एखाद्या ठिकाणी कागदोपत्री कामासाठी गेल्यास त्याठिकाणी आपले आधार कार्ड नसेल तर मोठा खोळंबा होतो. मात्र, आता या सगळ्याच तक्रारी दूर होण्याच्या मार्गावर आहेत. चुटकीसरशी यातली एक नि एक तक्रार आता दूर होणार आहे. 

या सगळ्याच समस्या आपण घरबसल्या कुठेही न जाता सहजपणे सोडवू शकणार आहोत. याचं कारण आहे mAadhaar App! हे ऍप जर आपल्याकडे नसेल तर ते आत्ताच डाऊनलोड करा. जर ते आधीपासूनच असेल तर ते अपडेट करा. कारण आता या ऍपचे नवे अपडेट आपला वेळ वाचवणारं ठरणार आहे.

 UIDAI ने mAadhaar App चे नवीन अपडेट आणले आहे. या अपडेटमुळे अनेक गोष्टी सहजसोप्या होणार आहेत. मात्र, हे ऍप घेताना आपल्याला बनावट आणि खोट्या ऍप्सपासून सावधान राहणं गरजेचं आहे. हे ऍप कुठूनही डाऊनलोड करु नका. ते डाऊनलोड करण्यासाठी UIDAI ने दिलेल्या अधिकृत लिंकवरुनच आधारचे हे खरे ऍप आपल्याला डाऊनलोड करता येईल.

महत्वाच्या बातम्या ===========

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice