महाराष्ट्रात प्रधानमंत्री पीक विमा योजनेस २३ जुलैपर्यंत मुदतवाढ | The Prime Minister’s Crop Insurance Scheme has been extended till July 23 in Maharashtra

महाराष्ट्रात प्रधानमंत्री पीक विमा योजनेस २३ जुलैपर्यंत मुदतवाढ | The Prime Minister’s Crop Insurance Scheme has been extended till July 23 in Maharashtra

प्रधानमंत्री पिक विमा योजनेतर्गंत महाराष्ट्रात प्रधानमंत्री पीक विमा योजनेस २३ जुलैपर्यंत मुदतवाढ. या योजनेंतर्गत सन 2021-22 मध्ये खरीप हंगामासाठी पिक विमा प्रस्ताव स्विकारणे सुरु झाले आहे. पिक विमा भरण्याचा अंतिम मुदत आता शुक्रवार 23 जुलै पर्यंत वाढविली आहे. पिक विमा योजनेत ज्या शेतकऱ्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी तात्काळ पिक विम्याची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. (The Prime Minister’s Crop Insurance Scheme has been extended till July 23 in Maharashtra)

यापूर्वी पिक विमा भरण्याचा अंतिम मुदत 15 जुलै दिली होती. तथापि महाराष्ट्र शासनाने भारत सरकारच्या कृषि मंत्रालयाला एवढ्या अल्पमुदतीत शेतकऱ्यांना पिक विमा काढणे कठीन असल्याचे निदर्शनास आणून यात मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. कोविड-19 ची परिस्थिती आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन ही मुदतवाढ करीत असल्याचे भारत सरकारच्या कृषि मंत्रालयाचे सहाय्यक आयुक्त सुनिलकुमार यांनी आदेशात म्हटले आहे.

राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होता यावे यासाठी अर्ज करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत वाढवून मिळावी अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य शासनाने आज केंद्र शासनाकडे पाठविल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याचा आज (१५ जुलै) शेवटची मुदत असून आतापर्यंत सुमारे ४६ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत, असे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले. मात्र राज्यातील काही भागात लांबलेला पाऊस, कोरोना प्रतिबंधासाठी असलेले निर्बंध यामुळे शेतकऱ्यांना मुदतीत विमा हप्ता भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होता यावे यासाठी सर्व बाबींचा विचार करून केंद्र शासनाने २३ जुलै पर्यंत योजनेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव आज राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठविला आहे. (The Prime Minister’s Crop Insurance Scheme has been extended till July 23 in Maharashtra)

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice