राजकीय वातावरण तापलेले असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीराजे यांचे वडील शाहू छत्रपती महाराजांचे आभार मानले आहेत. ‘शाहू छत्रपती महाराजांनी शिवसेनेला बदनाम करणाऱ्या भाजपचा मुखवटा फाडला, असे राऊत यांनी म्हटले आहे. ते याबाबत प्रसार माध्यमांशी बोलत होते.राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राज्यातील वातावरण चांगलच तापलंय. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द मोडला असा आरोप संभाजीराजेंनी शिवसेनेवर केला. त्यानंतर ‘हा छत्रपती घराण्याचा अपमान असल्याचा आरोप विरोधकांनी केला. मात्र शाहू छत्रपती महाराजांनी भाजपवरच गंभीर आरोप केले. ‘उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांना व्यक्तीगतरित्या उमेदवारी नाकारली आहे. याचा छत्रपती घराण्याशी काहीही संबंध नाही. हा…
Read MoreTag: Sanjay Raut
ED On Sanjay Raut |ईडीने या कारणामुळे खासदार संजय राऊत यांची संपत्ती केली जप्त
मुंबईः थेट शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि ईडीविरोधात रणशिंग फुंकणारे शिवसेना (ShivSena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या संपत्तीवर अखेर सक्तवसुली संचलनालयाने (ED) टाच आणलीय. संजय राऊत यांची अलिबागमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यात अलिबागमधील जमिनीचे आठ तुकडे, दादरमधील एक फ्लॅट जप्त करण्यात आलाय. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ही कारवाई केल्याचे समजते. या घोटाळ्यातील पैसे हे अलिबाग येथील जमीन खरेदीसाठी वापरले म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यानंतर शिवसेनेच्या बड्या नेत्यावर ईडीने केलेली ही पहिलीच कारवाई म्हणावी लागेल. या कारवाईवरून आता…
Read Moreफाईल भुतांनी पळवली! राजभवनात Governor Appointment MLA यादी उपलब्ध नाही.
मुंबई : विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नेमणुकीचा मुद्दा सहा महिने उलटल्यानंतरही प्रलंबित आहे. असं असताना राज्यपाल सचिवालयात याबाबतची यादी उपलब्ध नसल्याची माहिती राजभवनानं माहिती अधिकारात केलेल्या अर्जावर दिली आहे. ही बाब समोर आल्यानंतर यावरून शिवसेनेनं सामनातून राज्यपालांवर निशाणा साधला आहे. हा भूताटकीचा प्रकार असून राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी भुतांनी पळवल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे. तसेच गतिमान प्रशासनाच्या व्याख्येत महाराष्ट्राचे राजभवन बसत नाही काय? असा प्रश्नही सामनातून उपस्थित करण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नेमणुकीचा मुद्दासंदर्भात माहिती विचारली…
Read More