मुंबई, 07 फेब्रुवारी: गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं रविवारी सकाळी मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काल त्यांच्यावर शिवाजी पार्कवर (Shivaji Park)शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान त्यानंतर आता भाजपनं लतादीदींचं स्मारक शिवाजी पार्कवर करावं अशी मागणी केली आहे. भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी ही मागणी करुन यासंदर्भातलं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. या पत्रात राम कदमांनी शिवाजी पार्कवरच लतादीदींचं स्मृतीस्थळ बनवण्याची मागणी केली आहे. (BJP MLA Ram Kadam raised a new controversy over Lata Mangeshkar’s memorial) राम…
Read More