आरोग्य विभागात मेगाभरती! १६ हजार पदांसाठी निवडप्रक्रिया होणार ! कोरोना पार्श्वभूमीवर निर्णय.

राज्यात करोनाच्या संकटामुळे नागरिक त्रस्त असताना लॉकडाउनच्या निर्बंधांमुळे अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभागात तब्बल १६ हजार पदांची भरती प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यामध्ये क आणि ड वर्गातील एकूण १२ हजार पदं, ब वर्गातील २ हजार पदं आणि २ हजार विशेषज्ञांचा समावेश असणार आहे. येत्या आठवड्याभरात यासंदर्भातली शासन पातळीवरची निर्णय प्रक्रिया पार पाडली जाईल आणि त्यानुसार भरती प्रक्रियेला सुरुवात केली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे एकीकडे करोनामुळे बेरोजगारी किंवा आर्थिक अडचणीचा सामना सुरू…

Read More