महाराष्ट्र भुमीचे उध्दारकर्ते श्री. वसंतराव नाईककांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद या गावाजवळील गहुली या छोट्याश्या खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांनी सर्वात पहिले पुसद नगरपालिकेचे अध्यक्षपद भूषविले होते. ते महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय नेते होते. हरित क्रांतीचे प्रणेते अशी त्यांची ओळख होती. नाईक कुटुंब – नाईकांचे मूळ आडनाव राठोड असे होते; परंतु गहुली हे खेडे चतुरसिंग राठोड यांनी वसविले होते. त्यांनी जमीनजुमला जमा करून आपल्या समाजाला स्थिर जीवन प्राप्त करून दिले. साहजिकच ते बंजारा समाजाचे नाईक म्हणजे पुढारी झाले. त्यावरून पुढे त्यांचे आडनाव नाईक असे रूढ झाले. चतुरसिंगाचा मुलगा…
Read More