नवी दिल्ली: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार खाद्यतेलाच्या किंमती कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. गेल्या 48 तासात दोन मोठी पावले उचलण्यात आली आहेत. सणापूर्वी खाद्यतेलाच्या किंमती खाली आणून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. गेल्या वर्षभरात खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याने गरजेच्या इतर वस्तूही महाग झाल्या आहेत. अशा परिस्थितीत सरकार एका आघाडीवर दिलासा देण्याच्या योजनेसह काम करत आहे. (Edible oil rates in India) सरकारने शुक्रवारी काही खाद्यतेलांच्या आयातीवरील आयात शुल्कात मोठी कपात केली होती. जर कपातीचा संपूर्ण फायदा ग्राहकांना देण्यात आला…
Read More