महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांचा शरद पवारांच्या घरावर हल्ला; विरोधी पक्षनेते व वकील सदावर्ते यांच्यावर षडयंत्रांचा आरोप

Sharad Pawar :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतल्या सिल्व्हर ओक (Silver Oak) निवासस्थानाबाहेर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आज अचानक आंदोलन केलं. आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना सिल्व्हर ओकच्या आवारात घुसून शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानावर दगडफेक आणि चप्पलफेक केली.

पोलिसांकडून आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवार यांच्या समर्थनात घोषणाबाजी करत आहेत. शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आता मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सर्व आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं आहे. चर्चेसाठी तयार आहे. चप्पल फेक आणि दगड फेक करुन प्रश्न सुटणार नाहीत. असं आवाहन त्यांनी केलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देखील सुप्रिया सुळे यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. पोलिसांनी चांगलं काम केलं असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचे पदाधिकारी नरेंद्र राणे, बबन कनवजे यांनी ‘हे सगळे भाजपचे कारस्थान आहे. या आंदोलनास फडणवीस कारणीभूत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानात संधी दिली होती. त्यावेळी त्यांनी जयंत पाटील, अजित पवार, उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊन चर्चा करायला हवी होती. 

मात्र, कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन भरकटवले गेले. शरद पवार यांची प्रतिमा बिघडविण्यासाठीच हे कारस्थान केले जात आहे. यामागे भाजप, देवेंद्र फडणवीस आणि सदानंद गुणवर्ते हे जबाबदार

ST workers attack Sharad Pawar’s house; Leader of the Opposition and lawyer Sadavarte accused of conspiracy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Site Statistics
  • Today's visitors: 12
  • Today's page views: : 12
  • Total visitors : 512,689
  • Total page views: 539,596
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice