मोदींच्या राज्यात बलात्काऱ्याचा गौरव; केंद्र सरकार कृषी, युवा, महिला धोरणावर फेल

मोदींच्या राज्यात बलात्काऱ्याचा गौरव; केंद्र सरकार कृषी, युवा, महिला धोरणावर फेल

Sharad Pawar strongly criticized Prime Minister Narendra Modi On Women Policy

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची शनिवारी फेरनिवड करण्यात आली. नवी दिल्लीत कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या सभागृहात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत ही निवड पार पडली. यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. पवार यांनी ट्विट करून मोदींवर निशाणा साधला. Sharad Pawar strongly criticized Prime Minister Narendra Modi On Women Policy

https://youtu.be/zrBHITYNvFU

शरद पवार म्हणाले की, १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून महिलांच्या आदराविषयी भाषण केलं. एकीकडे महिलांच्या सन्मानाच्या गोष्टी करायच्या, अन् दुसरीकडे आपल्या गुजरात राज्यात बिलकीस बानो हिच्यावर अत्याचार करणारे, तिच्या कुटुंबातील सदस्यांची हत्या करणाऱ्या लोकांची शिक्षा माफ करण्याचं काम गुजरात सरकारने केलं. हे पाहून मी आश्चर्यचकित झाल्याचं पवार यांनी म्हटलं.

Read other News —-

<

Related posts

Leave a Comment