Raj Thackeray Dog James Death | राज ठाकरे वर कोसळला दुःखाचा डोंगर, लाडक्या जेम्सचे निधन, राजला अश्रू अनावर…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेयांचे श्वानप्रेम सगळ्यांनाच ठाऊक आहे. राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानी असलेल्या त्यांच्या लाडक्या जेम्सचं सोमवारी रात्री निधन झालं.
जेम्सच्या निधनानं ठाकरे कुटुंब भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. ग्रेट डेन जमातीचा जेम्स कित्येक वर्ष राज ठाकरेंसोबत होता. मात्र वाढत्या वयामुळे जेम्सनं अखेरचा श्वास घेतला.
जेम्सच्या निधनानंतर राज ठाकरे भावूक झाल्याचं दिसून आले. कुटुंबीयांकडून जेम्सच्या अंत्ययात्रेसाठी हार, फुलं आणि शाल अर्पण करून त्याला निरोप देण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून राज ठाकरेंकडे जेम्स आणि बॉन्ड नावाचे ग्रेट डेन प्रजातीचे श्वान आहेत.
राज ठाकरे यांनी नेहमी लहान मुलांप्रमाणे जेम्सला लळा लावला होता. या दोन्ही श्वानाच्या प्रशिक्षणासाठी त्यांनी एक ट्रेनरला ठेवला होता.
राज ठाकरेंचे आणि जेम्सचे अनेक फोटो बऱ्याचदा सोशल मीडियात व्हायरल झाल्याचं दिसून आलं होतं. राज ठाकरेंप्रमाणे त्यांचा मुलगा अमित ठाकरे यालाही श्वानाबद्दल अतिशय प्रेम आहे. अमित ठाकरे यांच्याकडे मुफासा आणि ब्ल्यू या नावाचे श्वान आहेत.
हे ही लेख वाचा ——–
- खवड्या डोंगर प्रकरणात नवा ट्विस्ट तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री : कुणाल चांदगुडे यांच्या आई संगीता चांदगुडे होत्या युट्युबर; कौटुंबिक वादाचे व्हिडिओ व्हायरलNew Twist in Khavdya Dongar Tragedy: Kunal Chandgude’s Mother Was a YouTuber; Family Dispute Videos Go
- छत्रपती संभाजीनगर : खवड्या डोंगरावर कुटुंबाची दुर्दैवी घटना, रागात आणि कौटुंबिक वादात संपूर्ण कुटुंबाचा अंतHeartbreaking Tragedy at Khavdya Dongar: Son Jumps, Parents Die Trying to Save Him छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील
- नरेंद्र मोदी यांनी वापरलेला ‘नक्षली दिमाग’ वक्तव्यावरून देशात नवा वाद: राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि लोकशाहीवरील परिणामांचा आढावाM Modi’s ‘Naxali Dimag’ Remark Sparks Debate: A Look at Political Fallout & National Security पंतप्रधान
- धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा : विद्यार्थी आंदोलनाचे मोठे यश NEET पेपर लीक प्रकरणात शिक्षण मंत्र्यांनी घेतली नैतिक जबाबदारी; प्रल्हाद जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभारनवी दिल्ली, २६ जुलै : राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (NEET-UG) पेपर लीक प्रकरण आणि परीक्षा पद्धतीतील अनियमिततेमुळे
- जंतर-मंतरवर CJP चा जोरदार आंदोलन; महाराष्ट्रातून मोठा सहभाग, धरमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीनवी दिल्ली/पुणे, १९ जुलै २०२६: कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या युवा आंदोलकांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर NEET पेपर

