Raj Thackeray Dog James Death | राज ठाकरे वर कोसळला दुःखाचा डोंगर, लाडक्या जेम्सचे निधन, राजला अश्रू अनावर…

Raj Thackeray Dog James Death | राज ठाकरे वर कोसळला दुःखाचा डोंगर, लाडक्या जेम्सचे निधन, राजला अश्रू अनावर…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेयांचे श्वानप्रेम सगळ्यांनाच ठाऊक आहे. राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानी असलेल्या त्यांच्या लाडक्या जेम्सचं सोमवारी रात्री निधन झालं.

जेम्सच्या निधनानं ठाकरे कुटुंब भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. ग्रेट डेन जमातीचा जेम्स कित्येक वर्ष राज ठाकरेंसोबत होता. मात्र वाढत्या वयामुळे जेम्सनं अखेरचा श्वास घेतला.

जेम्सच्या निधनानंतर राज ठाकरे भावूक झाल्याचं दिसून आले. कुटुंबीयांकडून जेम्सच्या अंत्ययात्रेसाठी हार, फुलं आणि शाल अर्पण करून त्याला निरोप देण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून राज ठाकरेंकडे जेम्स आणि बॉन्ड नावाचे ग्रेट डेन प्रजातीचे श्वान आहेत.

राज ठाकरे यांनी नेहमी लहान मुलांप्रमाणे जेम्सला लळा लावला होता. या दोन्ही श्वानाच्या प्रशिक्षणासाठी त्यांनी एक ट्रेनरला ठेवला होता.

राज ठाकरेंचे आणि जेम्सचे अनेक फोटो बऱ्याचदा सोशल मीडियात व्हायरल झाल्याचं दिसून आलं होतं. राज ठाकरेंप्रमाणे त्यांचा मुलगा अमित ठाकरे यालाही श्वानाबद्दल अतिशय प्रेम आहे. अमित ठाकरे यांच्याकडे मुफासा आणि ब्ल्यू या नावाचे श्वान आहेत.

हे ही लेख वाचा ——–

<

Related posts

Leave a Comment