Raj Thackeray Dog James Death | राज ठाकरे वर कोसळला दुःखाचा डोंगर, लाडक्या जेम्सचे निधन, राजला अश्रू अनावर…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेयांचे श्वानप्रेम सगळ्यांनाच ठाऊक आहे. राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानी असलेल्या त्यांच्या लाडक्या जेम्सचं सोमवारी रात्री निधन झालं.
जेम्सच्या निधनानं ठाकरे कुटुंब भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. ग्रेट डेन जमातीचा जेम्स कित्येक वर्ष राज ठाकरेंसोबत होता. मात्र वाढत्या वयामुळे जेम्सनं अखेरचा श्वास घेतला.
जेम्सच्या निधनानंतर राज ठाकरे भावूक झाल्याचं दिसून आले. कुटुंबीयांकडून जेम्सच्या अंत्ययात्रेसाठी हार, फुलं आणि शाल अर्पण करून त्याला निरोप देण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून राज ठाकरेंकडे जेम्स आणि बॉन्ड नावाचे ग्रेट डेन प्रजातीचे श्वान आहेत.
राज ठाकरे यांनी नेहमी लहान मुलांप्रमाणे जेम्सला लळा लावला होता. या दोन्ही श्वानाच्या प्रशिक्षणासाठी त्यांनी एक ट्रेनरला ठेवला होता.
राज ठाकरेंचे आणि जेम्सचे अनेक फोटो बऱ्याचदा सोशल मीडियात व्हायरल झाल्याचं दिसून आलं होतं. राज ठाकरेंप्रमाणे त्यांचा मुलगा अमित ठाकरे यालाही श्वानाबद्दल अतिशय प्रेम आहे. अमित ठाकरे यांच्याकडे मुफासा आणि ब्ल्यू या नावाचे श्वान आहेत.
हे ही लेख वाचा ——–
- इंडिया पोस्ट ऑफिस GDS भरती २०२६: सविस्तर माहिती – २८,७४० पदांसाठी अर्ज सुरू, १०वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी!भारत सरकारच्या संचार मंत्रालयाअंतर्गत भारत पोस्टने (Department of Posts) ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak –
- ताणतणावाचे व्यवस्थापन ते शिक्षणात AI, PFMS, आणि सुरक्षा मंत्र ! जालना जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांसाठी ‘बूस्टर’ कार्यशाळाजालना, दि. ७ फेब्रुवारी २०२६ – जिल्हा परिषद जालना, शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्या वतीने आज येथील
- बिग बॉस मराठी ६: दिव्या शिंदेची धक्कादायक हकालपट्टी! हिंसक भाषा आणि धमकीमुळे घराबाहेरमुंबई, ७ फेब्रुवारी २०२६: कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ मध्ये एक
- सुनेत्रा पवार यांची महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ |Sunetra Pawar takes oath as Maharashtra’s first woman Deputy Chief Minister.महाराष्ट्र, 31 जानेवारी 2026 — आज महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक महत्वाचा व ऐतिहासिक क्षण घडला आहे.
- Ajit Pawar Paas Away |विमान अपघातात महाराषट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच निधनमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एनसीपी)चे नेते अजित पवार यांचा बुधवारी सकाळी मुंबईहून पुण्याच्या बारामतीकडे

