महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली. आता महाराष्ट्राच्या विधिमंडळात सासरे आणि जावयांचं ‘राज्य’ असणार आहे. कारण विधानसभा आणि विधानपरिषद या दोन सभागृहाच्या ‘चाव्या’ आता सासरे आणि जावयाच्या हाती आल्या आहेत. विधानसभेत जावई राहुल नार्वेकर तर विधानपरिषदेत त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. Rahul Narvekar elected as Speaker of Maharashtra Legislative Assembly
नार्वेकर ते राज्याच्या आणि देशाच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. ते राज्य विधानसभेचे 20 वे अध्यक्ष आहेत. आज झालेल्या विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त 164 मतं मिळाली. तर राजन साळवी यांना 107 मतं मिळाली. समाजवादी पक्ष आणि एआयएमचे आमदार या मतदानात तटस्थ राहिले. एकूण तीन आमदार तटस्थ राहिले. अशा पद्धतीनं नार्वेकर मोठ्या मतांनी विजयी झाले. आता अध्यक्षांची भूमिका आता महत्वाची असणार आहे. कारण उद्या शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी देखील पार पडणार आहे. Rahul Narvekar elected as Speaker of Maharashtra Legislative Assembly
राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड करावी असा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी मांडला त्याला गिरीश महाजन यांनी अनुमोदन दिलं. तर चेतन तुपे यांनी साळवी यांचा प्रस्ताव मांडला, तर संग्राम थोपटे यांनी अनुमोदन दिलं. नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जावे लागणार आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अध्यक्षांची निवड झाली आहे. शिंदे सरकारकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं तर महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणाला राजन साळवी यांना मैदानात उतरवलं होतं. एकनाथ शिंदे गट आणि भाजपचं संख्याबळ पाहता राहुल नार्वेकर हेच विधानसभा अध्यक्ष होतील हे जवळपास निश्चित होतं.
विधानमंडळावर सासरे आणि जावयांचं ‘राज्य’
राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानं विधानमंडळावर सासरे आणि जावयांचं ‘राज्य’ असणार आहे. विधानसभेत जावई राहुल नार्वेकर तर विधानपरिषदेत त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती म्हणून जावई आणि सासरे अशी जोडी पाहायला मिळाली आहे.
राहुल नार्वेकर हे 45 वर्षांचे आहेत. ते विधानसभेचे आजवरचे सर्वात तरूण अध्यक्ष ठरले आहेत. राहुल नार्वेकर हे एकेकाळचे शिवसेनेचे खंदे नेते होते. त्यानंतर ते राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत होते. आता ते भाजपाचे आमदार आहेत. राहुल नार्वेकर यांना भाजपाने विधानसभा अध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर करत आणखी एक मास्टरस्ट्रोक खेळला आहे. राहुल नार्वेकर हे मुंबईतील कुलाबा मतदार संघाचे आमदार आहेत.
कोण आहेत राहुल नार्वेकर (Know About Rahul Narvekar)
शिवसेनेतून राजकीय प्रवासाला सुरुवात
तीन वर्ष राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य
2019 च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश
2019 साली कुलाबा मतदारसंघातून आमदार
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकरांचे जावई
बहुमत चाचणीवेळी अध्यक्षांची भूमिका महत्वाची
विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवाराची घोषणा झालेली नव्हती. शेवटी तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी चर्चा करुन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब केला. नवनियुक्त शिंदे सरकारची बहुमत चाचणी दोन दिवसाच्या अधिवेशनात होणार आहे. त्याआधी विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांनी बाजी मारली आहे. शिंदे गट आणि भाजपच्या बहुमत चाचणीवेळी अध्यक्षांची भूमिका महत्वाची असणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- हा हिंदूत फुट पाडणारा राक्षस; कालीचरण महाराजांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टिका
- Maharashtra Assembly Elections -2024 प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी 5 वाजल्यापासून थंडावल्या.
- बाभळीच्या शेंगा हे आयुर्वेदातील एक महत्त्वाचे औषध; जाणून घ्या फायदे |Acacia pods are an important medicine in Ayurveda; Know the benefits
- Former Cricketer Sanjay Bangar Son Aryan Gender Transformation To Anaya | टिम इंडियाचा माजी क्रिकेटर संजय बांगरचा मुलगा आर्यन बांगर लिंग परिवर्तन करुन मुलगी अनया बांगर झाला
- देवगिरी संस्थेच्या विद्यार्थ्यांचा अविष्कार २०२४ स्पर्धेत विभागीय पातळीवर सुवर्ण कामगिरी