सध्या राज्यात विरोधी पक्ष राज्यातील महाविकास आघाडी सरकार कधी पडणार याचे मुहुर्त सांगत आहे. तर सत्ताधारी आमचे सरकार कसे मजबूत आहेत, याची माहिती देण्यात व्यस्त आहे. मात्र, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाकडे यामुळे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांच्या विरोधी पक्ष नेत्याच्या भूमीकेत जावे, असा सल्ला भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दिला. दसरा मेळाव्यानिमित्त मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
राज्यात युतीचे सरकार स्थापन झाल्यापासून ते आता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापर्यंत, पंकजा मुंडे अनेकदा नाराज झाल्या होत्या. मात्र, यात त्यांनी कधीच देवेंद्र फडणवीस यांच्यावर सरळ-सरळ टीका केली नाही. किंवा त्यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख केला नाही. या वेळी मात्र, त्यांनी स्पष्ट शब्दात देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहे. आता तुम्ही तुमच्या विरोधी पक्ष नेत्याच्या भूमीकेत काम करा, असा सल्लाच त्यांनी दिला आहे.
गोपोनाथ मुंडे विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी राज्यात सरकार विरोधी रान पेटवले होते. त्यामुळेच त्या वेळी युतीचे सरकार राज्यात आले होते. आता तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात. तुम्ही ते काम करा, असाही सल्ला त्यांनी या वेळी दिला. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची मी वाट पाहतेय. त्यांच्या दसरा मेळाव्यात त्यांनी कठोर भूमीका घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
Don’t dream of dimolish the government. Go into the role of opposition. Pankaja Munde’s indirect criticism of Fadnavis
==================================================================================
- India Post Office Bharti | भारतीय डाक विभागात Garmin Dak Sevak पदांच्या एकूण २१४१३ जागा
- लाडकी बहीण योजना विषयी मंत्री आदिती तटकरे यांनी केली महत्वपूर्ण घोषणा
- शिवद्रोही राहुल सोलापूरकरच्या “आग्र्याहून सुटका” ऐतिहासिक घटनेबद्दल वक्तव्यचा दूरगामीकाय परिणाम होतो. कोणत्या गोष्टीला हानी पोहोचवते.
- जालना शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनसह पालक मेळावा, बाल विवाह जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
- अंजली बदनामिया यांनी माझ्यावर केलेले कृषी साहित्य खरेदी घोटाळ्याचे आरोप खोटे धनंजय मुंडे यांचा पलटवार