मुंबई: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आष्टीचे आमदार सुरेश धस हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बोलत असताना रश्मीका मंदाना, सपना चौधरी, व प्राजक्ता माळी यांचे नाव घेऊन “political event management चा Parli pattern” या विषयी “व्यंग्यात्मक” टिप्पणी केल्याबद्दल अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आमदार धस यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन आक्षेप नोंदवला आहे. प्राजक्ता माळी सोनी मराठीच्या ‘महाराष्ट्राची हस्य जत्रा’ या विनोदी मालिकेचे सूत्रसंचालन करतात, ज्यामध्ये लोकप्रिय अभिनेते आणि व्यावसायिक विनोदी कलाकार स्टेजवर सादरीकरण करतात. माळी या प्रशिक्षित नृत्यांगना आहेत त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. Prajakta Mali objects to Suresh Dhas’s “satirical” comment
माळी यांनी आष्टीचे आमदार आणि माजी मंत्री धस यांनी मुंडे यांच्यावर टीका करत असताना विनाकारण आमच्याबद्दल व्यंग्यात्मक टिप्पणी केली. तुमच्या राजकीय चिखलफेकीत महिला कलाकारांना का ओढता. पत्रकार परिषदेत सांगितले. महिलांची बदनामी केल्याबद्दल सोशल मीडिया, पोर्टल आणि माध्यमांना जबाबदार धरण्याची मागणी करत ती राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याचे तिने सांगितले. prajakta mali slams bjp mla suresh dhas for derogatory comments
“धसासाहेबांनी माझ्या आणि काही अभिनेत्रींविरुद्ध केलेल्या व्यंग्यात्मक टिप्पणी वाईट आणि पूर्णपणे निराधार आहेत… ही विधाने अपमानास्पद आणि कलाकार समुदायाला अनावश्यकपणे ओढणारी होती, “असे माळी म्हणाल्या ” ते एक निवडून आलेले प्रतिनिधी आहेत आणि त्यांनी असे बोलायला नको होते,” त्यांनी आमदार सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडेही तक्रार दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले. धस यांनी माळी, अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांचे नाव घेतले होते आणि “परळी पॅटर्न” आणि “इव्हेंट मॅनेजमेंट ” बद्दल बोलले होते.
परळी येथील एका सांस्कृतिक कार्यक्रमातील छायाचित्रावरून सोशल मीडियावर अनेक क्लिप्स आणि बनावट बातम्या फिरत असतानाही माळी म्हणाल्या की त्या शांत राहिल्या. “महिला, विशेषतः महिला कलाकार, सॉफ्ट टार्गेट नसावेत,” त्या म्हणाल्या, एका पुरस्कार सोहळ्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी परळी येथे गेली होती.
धनंजय मुंडे यांचे सबंधित असलेल्या करुणा शर्मा – मुंडे यांनी सोशल मीडियावर काही दिवसापूर्वी प्राजक्ता माळीसह काही महिलांचे नाव घेत धनंजय मुंडे यांच्या सोबत जोडत ओबेराय हाटेलच्या नावाचा समावेश केला होता त्या केलेल्या टिप्पण्यांबद्दल बोलताना माळी म्हणाल्या की त्यांनी त्यांना नोटीस पाठवली आणि नंतर त्या थांबल्या. “करुणा मुंडे… स्पष्टीकरण न देता बोलू नका. तुमची माहिती चुकीची आहे,” तुमचे माहितीचे सौर्स तपासून घ्या चुकीच्या माहीतेवर बोलू नका
“फक्त परळीच नाही, माझ्यासारखे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी अनेक शहरांमध्ये प्रवास करतात. महिलांची नावे का घेतली जातात, पुरुष कलाकार राजकारण्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना उपस्थित राहत नाहीत का?” त्या म्हणाल्या , “आम्ही वेगवेगळ्या शहरांना भेट देतो. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आमच्याकडे अनेक राजकारण्यांसह फोटो असतात… त्यांना जोडणे योग्य आहे का… हे महिलांना बदनाम करण्यासाठी नाही तर तुमची स्वतःची मानसिकता देखील दर्शवते”.