रानबाजारात अभिनेत्री प्राजक्ता माळीचा बोल्ड सेक्सी भूमिका

रानबाजारात अभिनेत्री प्राजक्ता माळीचा बोल्ड सेक्सी भूमिका

अभिनेत्री प्राजक्ता माळीला प्रेक्षकांनी आजपर्यंत सोज्वळ आणि गोंडस भूमिकांमध्ये पाहिलं आहे. पण लवकरच अभिनेत्री प्राजक्ता माळी एका नव्या रूपात दिसणार आहे. नुकतंच अभिनेत्री प्राजक्ता माळीची प्रमुख भूमिका असलेल्या एका वेबसिरीजचा टीझर समोर आला आहे. या टीझरमध्ये अभिनेत्री(Actress) प्राजक्ता माळीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.(prajkta mali play bold role in upcoming webseries)

या वेबसिरीजचे नाव ‘रानबाजार’ असे आहे. प्लॅनेट मराठी या निर्मिती संस्थेने ‘रानबाजार’ वेबसिरीजची निर्मिती केली आहे. या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित देखील प्रमुख भूमिकेत आहे. अभिजित पानसे यांनी ‘रानबाजार’ या वेबसिरीजचे दिग्दर्शन केले आहे. या वेबसिरीजची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

या वेबसिरीजचे सध्या दोन टीझर प्रदर्शित झाले आहेत. या टीझरवरून ही मराठीतील सर्वात बोल्ड सिरीज असल्याचे संगितले जात आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या वेबसिरीजचा टीझर शेअर केला आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून या टीझरचा व्हिडिओ शेअर केला आहे.

या टीझरमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी इंटिमेट सीन देताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “प्रत्येक कलाकाराला आपल्या कारकिर्दीत विविधांगी भूमिकांमध्ये झळकण्याची, समाजात अस्तित्वात असणारी विविध पात्रं साकारण्याची, सतत काहितरी नवं करण्याची इच्छा असते. मी त्याला अपवाद नाही.”

“लहानपणापासून स्मिता पाटील, रंजना यांना बघत मोठी झाले (मी त्यांच्याइतकी मोठी नक्कीच नाही.) पण त्यांच्या कारकिर्दीतून प्रेरीत होऊन आणि तुम्हां मायबाप रसिक प्रेक्षकांवर विश्वास ठेवून केलेला हा प्रयत्न”, असे अभिनेत्री प्राजक्ता माळीने त्या पोस्टमध्ये लिहिले आहे. यावेळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे आभार मानले आहेत.

https://www.instagram.com/tv/Cdkkcv3AKO6/?utm_source=ig_web_button_share_sheet

“माझ्यातल्या अभिनेत्रीवर विश्वास ठेवून माझ्या पदरी ही भूमिका टाकल्याबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसे आणि मराठीतील सगळ्यात मोठी web series बनवल्याबद्दल प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर यांचे आभार. १८ तारखेलाला trailer येतोय, २० ला series येतेय…”, असे अभिनेत्री प्राजक्ता माळीने लिहिले आहे.

हा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळीला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. या टीझरवरून अनेकांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीवर टीका केली आहे. काही जणांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे या भूमिकेसाठी कौतुक देखील केले आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या वेबसिरीजसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :-

<

Related posts

Leave a Comment