ZP’s CEO suspends five absent teachers in Bhokar
Online Team | कोरोना महामरी मुळे जगाची टाळेबंदी झाली होती. त्यामुळे शाळेलाही कुलुप लागले होते. आता तब्बल दिड वर्षानी शाळेची घंटा वाजली असताना प्रशासने तगडे नियोजन करुन शालेय व्यवस्थापन व नियोजन यशस्वी होऊन गुणवत्ता पुर्ण शिक्षण देऊन मागील दिडवर्षाच्या कालावधीची कसर दूर करण्यासाठी निरक्षीणीय यंत्रणा मार्फत शाळा भेट देऊन शालेय नियोजन पहाणी करण्यात येत आहे.
याचाच भाग म्हणून जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी भोकर तालुक्यातील शाळा भेट दौऱ्यावर असताना एका शाळेत पन्नास टक्के पेक्षाही कमी उपस्थिती दिसल्याने जागीच कार्यवाही करत पाच शिक्षकांचे निलंबन केले आहे. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वृद्धी होण्यासाठी शिक्षकांनी परिश्रम करावेत असे अवाहन ही केले. (Nanded ZP’s CEO suspends five teachers This was causing academic loss to the students)
नांदेड शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याच्या सूचना – दीड वर्षानंतर शाळा सुरू झाल्या असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी शाळेच्या दुसर्या दिवशी वेळेवर न दाखविणा शिक्षकांवर जोरदार हल्लाबोल केला. भोकर येथील लेट्लतीफ यांनी पाचशिक्षक निलंबित केले. या कारवाईच्या परिणामी, शिक्षकांनी शाळेच्या घंटा वाजण्यापूर्वी शाळेच्या मैदानात उपस्थित राहणे अपेक्षित आहे. नांदेड झेडपीच्या सीईओने पाच शिक्षकांना निलंबित केले यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. दरम्यान, राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात 15 जुलैपासून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील 390 माध्यमिक शाळांमध्ये वर्ग सुरू झाले असून विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय असून शिक्षकांना पन्नास टक्के हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत.
प्रत्येक शिक्षकाची कोरोना तपासणे देखील आवश्यक आहे. कोविडमुळे झालेल्या विद्यार्थ्यांच्या नुकसानीची पूर्तता करण्याची ही संधी आहे आणि शिक्षणाची कामे प्रत्येक शिक्षकाने स्वतःच करावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी केले. ठाकूर यांनी शुक्रवारी पाच ते सहा शाळांना विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या. Nanded ZP’s CEO suspends five teachers This was causing academic loss to the students
- पुन्हा आलो, देवाभाऊच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, भाजपच्या बैठकीत नाव निश्चितभारताच्या आर्थिक राजधानीत महायुती युती पुन्हा सत्तेवर आल्यानंतर अनेक दिवसांच्या सस्पेन्सचा शेवट करून…
- Maharashtra Assembly Election 2024 | मोदीजी जो निर्णय घेतील तो मान्य असेल. मुख्यमंत्रीपदापासून एकनाथ शिंदेंची माघार की मजबुरी?मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाला पाच दिवस उलटूनही महायुतीला अद्याप मुख्यमंत्र्यांच्या नावाची…
- लाडके भाऊच पुन्हा सत्तेवर, महायुती 230 जागा जिंकून प्रचंड बहुमतात विजयी..राज्यातील जनतेने आज सत्ताधारी महायुतीच्या पदरात भरभरून मतांचे दान टाकले. महाविकास आघाडीची अक्षरशः…
- हा हिंदूत फुट पाडणारा राक्षस; कालीचरण महाराजांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टिकाकालिचरण महाराज छत्रपती संभाजीनगर येथील एका कार्यक्रमात मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीत वादग्रस्त…
- Maharashtra Assembly Elections -2024 प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी 5 वाजल्यापासून थंडावल्या.मुंबई : महाराष्ट्रातील २८८ विधानसभा जागांसाठीच्या निवडणूक प्रचाराचा आज सोमवारी शेवटचा दिवस आहे.…
प्रेस नोट
दिनांक 16 जुलै 2021
भोकर येथील शाळेस सिईओ वर्षा ठाकूर-घु्गे यांची अचानक भेट
5 शिक्षक तडकाफडकी निलंबीत
नांदेड, 16- भोकर येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक नुतन शाळेस आज शुक्रवार दिनांक 16 जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भेटी देवून शाळेची पाहणी केली. यावेळी अनुपस्थित असलेल्या 5 शिक्षकांना त्यांनी तडकाफडकी निलंबीत केले आहे.
सिईओ यांचा भोकर तालुक्यात आज दौरा होता. दरम्यान त्यांनी जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेस भेट देवून ही कार्यवाही केली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर शिक्षकांना शाळेत 50 टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. 50 टक्के प्रमाणे आज 19 शिक्षक उपस्थित राहणे आवश्यक होते. परंतु शाळा भेटी दरम्यान 5 शिक्षक अनुस्थित आढळून आल्यामुळे निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. तर एका शिक्षकास कारणे दाखवा नोटीस देण्यात आली.
नियमानुसार शिक्षक शाळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन प्रणालीव्दारे तसेच शिक्षक मित्र उपक्रमातून प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचणे आवश्यक आहे. याचे सर्व नियोजन शाळास्तरावर उपस्थित राहून शिक्षकांनी करणे आवश्यक आहे. परंतु येथील शाळेत शिक्षक अनुपस्थित असल्याने सिईओंनी चांगलेच खडसावले.
शैक्षणिक गुणवत्ता वाढ अभिनांतर्गत मुलांची इंग्रजी व गणित विषयाची चांगली तयारी करुन घेण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच नव-नवे उपक्रम राबवण्याची आवश्यकता आहे. माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत शाळेत वृक्ष लागवड, डिजीटल शाळा, रंगरंगोटी व सुशोभिकरण करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दरम्यान जिल्हा परिषद हायस्कुल भोकर, बारड व शेंबोली येथे शाळांना भेटी दिल्या. तसेच बारड ग्राम पंचायत व शेंबोली येथील आरोग्य उपक्रेंद्रास त्यांनी भेट देवून संवाद साधला.
चौकट
मुदखेड तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल बारड, कें.प्रा.शा. बारड आणि शेंबोली वस्ती येथे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी आज भेट दिली. जिल्हा परिषद प्रशाला बारड येथे शिक्षकांनी शाळेत होत असलेल्या उपक्रमासंबंधी माहिती दिली. नावीन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण केले. ऑनलाइन शिक्षण, सेतू अभ्यासक्रमा विषयी मुख्याध्यापिका श्रीमती तळणकर यांनी माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी शैक्षणिक गुणवत्ता, स्वच्छ शाळा सुंदर शाळा करणे, बाला अंतर्गत शाळेची रंगरंगोटी, ॲस्ट्रॉनॉमी, खगोलशास्त्र, भाषाविषयक जाणिवा वाढवणे, बोलक्या भिंती, रोपवाटिका, नर्सरी तयार करणे आदी बाबतीत सूचना केल्या. वस्ती शेंबोली येथील शाळेस त्यांनी भेट दिली. रूपाली कांबळे, कोमल लोमटे यांनी शाळेतील उपक्रमांची माहिती दिली. ओम नावाच्या विद्यार्थ्याला आई बाबा नाहीत. हा विद्यार्थी आजीकडे राहून शिक्षण घेतो. त्यासाठी आवश्यक सर्व मदत करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.