Monsoon | राज्या 9 ते 14 जूनदरम्यान अतिवृष्टीचा इशारा
Online Team | भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईत सकाळपासून पावसानं (Mumbai Rains) हजेरी लावली आहे. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. थोड्याचवेळात समुद्रालाही मोठी भरती येणार आहे. या काळात पाऊस असाच सुरु राहिल्यास या भागांमध्ये आणखी पाणी तुंबण्याची शक्यता आहे. सायनमध्ये अनेक घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. शहर आणि उपनगराच्या परिसरात पहाटेपासून संततधार पाऊस पडताना दिसत आहे. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. हा अंदाज आता काहीप्रमाणात खरा ठरताना दिसत आहे. (Mumbai rains live Maharashtra weather forecast update today heavy rain alert in Thane Raigad konkan pune monsoon by IMD and skymet mumbai local update)
यंदा मान्सूनची वाटचाल अपेक्षेपेक्षा अधिक वेगात होत आहे. मान्सूनने हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाच्या पाच दिवसांपूर्वीच राज्यात तर तीन दिवसांपूर्वीच विदर्भात प्रवेश केला. हवामान खात्यानुसार १० ते १२ जून या काळात बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे मान्सून १२ ते १४ जून या काळात विदर्भात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. परंतु, हवामान खात्याचा राज्यासाठीच्या अंदाजानंतर आता विदर्भासाठीचाही अंदाज चुकला आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात वादळी पावसाची हजेरी लागते आहे. अशातच मंगळवारी शहर तसेच विदर्भात दमदार पाऊस झाला. तर आज मान्सून विदर्भात दाखल झाल्याचे हवामान खात्याने अधिकृतरित्या जाहीर केले. आज विदर्भ, गुजरात, तेलंगण आणि आंध्र प्रदेशातील काही भागात मान्सूनने प्रवेश केल्याचे खात्याकडून जाहीर करण्यात आले. पुढील तीन दिवसांत मान्सून पूर्व उत्तर प्रदेशापर्यंत पोहचेल असा अंदाज आहे.
मुंबईत अतिमुसळधार पावसामुळे सेंट्रल रेल्वेची वाहतूक विस्कळीत, किंग्ज सर्कलवर पाणी साचलं
अतिमुसळधार पावसामुळे सेंट्रल रेल्वे विस्कळीत झाली आहे. सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान ट्रेन बंद करण्यात आल्या आहेत. सायन स्टेशन, किंग्ज सर्कल, अशा काही ठिकाणी ट्रॅकवर पाणी साचल्याने निर्णय घेतला..
— हे ही वाचा —
- महादेव मुंडे हत्या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा: SIT ची स्थापनामुंबई, 31 जुलै 2025: बीड जिल्ह्यातील परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या क्रूर हत्येप्रकरणी तब्बल 18 महिन्यांनंतरही आरोपींना अटक न झाल्याने या प्रकरणाने पुन्हा एकदा
- या कारणामुळे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्ततामुंबई, 31 जुलै 2025: मालेगाव येथील 2008 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) कोर्टाने सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. यामध्ये माजी
- सैय्यारा (2025): प्रेम, वेदना आणि विस्मरणाच्या प्रवासाची संगीतमय कथाSaiyyaraa (2025): A musical tale of a journey of love, pain and oblivion मुंबई | 2025: प्रतिनिधी | (न्यूज महाराष्ट्र व्हाईस )बॉलीवूडमध्ये संगीतमय प्रेमकथा हा
- 9 वे पर्यावरण संमेलन 2025 ला नांदेड जिल्हाधिकारी यांची उपस्थिती लाभणार; जिल्हाधिकारी यांना पर्यावरण मंडळाच्या वतीने निमंत्रणNanded District Collector To Attend 9th Environment Conference 2025 Invited By Nisarga Samajik Paryavaran Nivaran Mandal माहुर प्रतिनिधी:- नांदेड जिल्हा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांची
- मुंबई महाराष्ट्र विधानभवनात आमदार पडळकर-आव्हाड कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी, ही आहे वादाची पार्श्वभूमीClash at Mumbai’s Maharashtra Vidhan Bhavan: Padalkar-Awhad Supporters Engage in Fierce Brawl मुंबई, १७ जुलै २०२५ – महाराष्ट्र विधानभवनात आज, गुरुवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना