Online Team | भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईत सकाळपासून पावसानं (Mumbai Rains) हजेरी लावली आहे. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. थोड्याचवेळात समुद्रालाही मोठी भरती येणार आहे. या काळात पाऊस असाच सुरु राहिल्यास या भागांमध्ये आणखी पाणी तुंबण्याची शक्यता आहे. सायनमध्ये अनेक घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. शहर आणि उपनगराच्या परिसरात पहाटेपासून संततधार पाऊस पडताना दिसत आहे. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. हा अंदाज आता काहीप्रमाणात खरा ठरताना दिसत आहे. (Mumbai rains live Maharashtra weather forecast update today heavy rain alert in Thane Raigad konkan pune monsoon by IMD and skymet mumbai local update)
यंदा मान्सूनची वाटचाल अपेक्षेपेक्षा अधिक वेगात होत आहे. मान्सूनने हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाच्या पाच दिवसांपूर्वीच राज्यात तर तीन दिवसांपूर्वीच विदर्भात प्रवेश केला. हवामान खात्यानुसार १० ते १२ जून या काळात बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे मान्सून १२ ते १४ जून या काळात विदर्भात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. परंतु, हवामान खात्याचा राज्यासाठीच्या अंदाजानंतर आता विदर्भासाठीचाही अंदाज चुकला आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात वादळी पावसाची हजेरी लागते आहे. अशातच मंगळवारी शहर तसेच विदर्भात दमदार पाऊस झाला. तर आज मान्सून विदर्भात दाखल झाल्याचे हवामान खात्याने अधिकृतरित्या जाहीर केले. आज विदर्भ, गुजरात, तेलंगण आणि आंध्र प्रदेशातील काही भागात मान्सूनने प्रवेश केल्याचे खात्याकडून जाहीर करण्यात आले. पुढील तीन दिवसांत मान्सून पूर्व उत्तर प्रदेशापर्यंत पोहचेल असा अंदाज आहे.
मुंबईत अतिमुसळधार पावसामुळे सेंट्रल रेल्वेची वाहतूक विस्कळीत, किंग्ज सर्कलवर पाणी साचलं
अतिमुसळधार पावसामुळे सेंट्रल रेल्वे विस्कळीत झाली आहे. सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान ट्रेन बंद करण्यात आल्या आहेत. सायन स्टेशन, किंग्ज सर्कल, अशा काही ठिकाणी ट्रॅकवर पाणी साचल्याने निर्णय घेतला..
— हे ही वाचा —
- भारतात एप्रिल पासून आर्थिक क्षेत्रात मोठे बदल, कर सवलत बँक चार्जेस, पॅन,आधार आणि बरच काही वाचा सविस्तर तुमच्या फायद्याची गोष्टBig money rule changes from April 1: Tax relief, UPI deactivation, PAN-Aadhaar impact and more भारतातील आर्थिक वर्ष 2023-24 मार्च अखेर संपलं नवीन आर्थिक वर्ष…
- Samagra Shiksha Contract Employee Regular |समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सरकारच्या आश्वासनाने स्थगित, तीन महिन्याच्या आत कायम करणार?समग्र शिक्षा हे केंद्र शासनाची शिक्षण विभागात चालणारी महत्त्वपूर्ण योजना असून या मार्फत अनेक उपक्रम चालतात सदरील योजना अंमलबजावणीसाठी विविध अशा 14 पदांचे केडर कार्यरत…
- India Post Office Bharti | भारतीय डाक विभागात Garmin Dak Sevak पदांच्या एकूण २१४१३ जागाभारतीय डाक विभाग यांच्या आस्थापनेवरील ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण २१,४१३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि भरण्यासाठी तपशीलवार सूचना…
- लाडकी बहीण योजना विषयी मंत्री आदिती तटकरे यांनी केली महत्वपूर्ण घोषणामुंबई, दि. ०७: कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची…
- शिवद्रोही राहुल सोलापूरकरच्या “आग्र्याहून सुटका” ऐतिहासिक घटनेबद्दल वक्तव्यचा दूरगामीकाय परिणाम होतो. कोणत्या गोष्टीला हानी पोहोचवते.ज्या इतिहासापासून या देशातील महाराष्ट्रातील तरुणांना प्रेरणा मिळते जीवन जगण्याला, राष्ट्राला, सैन्याला ऊर्जा मिळते. असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची अनेक वेळा मोडतोड करताना तथाकथित इतिहास…