Monsoon | राज्या 9 ते 14 जूनदरम्यान अतिवृष्टीचा इशारा

Monsoon | राज्या 9 ते 14 जूनदरम्यान अतिवृष्टीचा इशारा

Online Team | भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईत सकाळपासून पावसानं (Mumbai Rains) हजेरी लावली आहे. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. थोड्याचवेळात समुद्रालाही मोठी भरती येणार आहे. या काळात पाऊस असाच सुरु राहिल्यास या भागांमध्ये आणखी पाणी तुंबण्याची शक्यता आहे. सायनमध्ये अनेक घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. शहर आणि उपनगराच्या परिसरात पहाटेपासून संततधार पाऊस पडताना दिसत आहे. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. हा अंदाज आता काहीप्रमाणात खरा ठरताना दिसत आहे. (Mumbai rains live Maharashtra weather forecast update today heavy rain alert in Thane Raigad konkan pune monsoon by IMD and skymet mumbai local update)

यंदा मान्सूनची वाटचाल अपेक्षेपेक्षा अधिक वेगात होत आहे. मान्सूनने हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाच्या पाच दिवसांपूर्वीच राज्यात तर तीन दिवसांपूर्वीच विदर्भात प्रवेश केला. हवामान खात्यानुसार १० ते १२ जून या काळात बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे मान्सून १२ ते १४ जून या काळात विदर्भात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. परंतु, हवामान खात्याचा राज्यासाठीच्या अंदाजानंतर आता विदर्भासाठीचाही अंदाज चुकला आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात वादळी पावसाची हजेरी लागते आहे. अशातच मंगळवारी शहर तसेच विदर्भात दमदार पाऊस झाला. तर आज मान्सून विदर्भात दाखल झाल्याचे हवामान खात्याने अधिकृतरित्या जाहीर केले. आज विदर्भ, गुजरात, तेलंगण आणि आंध्र प्रदेशातील काही भागात मान्सूनने प्रवेश केल्याचे खात्याकडून जाहीर करण्यात आले. पुढील तीन दिवसांत मान्सून पूर्व उत्तर प्रदेशापर्यंत पोहचेल असा अंदाज आहे.

मुंबईत अतिमुसळधार पावसामुळे सेंट्रल रेल्वेची वाहतूक विस्कळीत, किंग्ज सर्कलवर पाणी साचलं

अतिमुसळधार पावसामुळे सेंट्रल रेल्वे विस्कळीत झाली आहे. सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान ट्रेन बंद करण्यात आल्या आहेत. सायन स्टेशन, किंग्ज सर्कल, अशा काही ठिकाणी ट्रॅकवर पाणी साचल्याने निर्णय घेतला..

हे ही वाचा

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice