Monsoon : मान्सुन केरळात दाखल , आपल्याकडेही लवकरच येणार

Monsoon : मान्सुन केरळात दाखल , आपल्याकडेही लवकरच येणार

मुंबई ः  कधी येईल याकडे सक्ष असलेला नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा मोसमी पाऊस (मॉन्सून) आज गुरुवार दि. 3 रोजी अखेर केरळमध्ये दाखल झाला. केरळनंतर आता आपल्याकडेही लवकरच येणार आहे. गेल्यावर्षीही 3 जुनलाच मान्सुचा पाऊस आला होता. यंदा सरासरीएवढा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने  सांगितला आहे. त्यामुळे सध्यातरी शेतकऱ्यांत समाधान दिसत असून पेरण्याची तयारी करत शेतकामाची लगबग सुरु आहे.  

हवामान विभागाने यंदा 1 जून  रोजी केरळात मान्सुनचा पाऊस येईल असा अंदाज दिला होता. मात्र तीन दिवस हा पाऊस लांबला. अंदामान बेटांवर २१ मे रोजी मान्सुन आल्यानंतर २७ जूनला, श्रीलंका, मालदीव च्या समुद्री भागात हा पाऊस आला. 

हे ही वाचा ः

आता आजपर्यत आरबी समुद्राचा दक्षीण भाग, बंगालच्या उपसागरातील बहूतांश भागात मान्सुनचा पाऊस पोचला आहे. महाराष्ट्रातही हा पाऊस लकरच येणार असून त्यासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. दरम्याण राज्यातील काही भागात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.  

ऑगस्ट सप्टेंबरमध्ये चागंला पाऊस

डॉ.रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे. कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही काळ पावसात खंड पडेल, असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे. विदर्भातील विविध भागात म्हणजे पश्चिम विदर्भात 98 टक्के, मध्य विदर्भात 102 टक्के, पूर्व विदर्भात 100 टक्के, मराठवाडा 98 टक्के, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात 98 टक्के, पश्चिम महाराष्ट्रात 99 टक्के मान्सन बरसेल, असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे.

भारतीय हवामान विभागानं नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून 3 जूनला केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानं यापूर्वी मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होईल, असं सांगितलं होते.

<

Related posts

Leave a Comment