MHT CET Exam 2021| परीक्षेच्या तारखा जाहीर, ‘या’ दिवशी परीक्षेला सुरुवात

MHT CET Exam 2021| परीक्षेच्या तारखा जाहीर, ‘या’ दिवशी परीक्षेला सुरुवात

मुंबई: महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत एमएचटी सीईटी परीक्षेच्या तारखांसदर्भात माहिती दिली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणारी एमएचटी परीक्षा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीमध्ये घेण्यात येईल अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा कोरोना नियमांचं पालन करुन आयोजित करण्यात येतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. MHT CET Exam 2021 | Exam dates announced

15 सप्टेंबरपासून परीक्षा सुरु
व्यावसायिक अभ्यासक्रमांची एमएचटी सीईटी परीक्षा15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर कालावधीत होणार आहे 20 ऑक्टोबर पर्यंत निकाल जाहीर केले जातील, असंही ते म्हणाले. याशिवाय यंदा सीईटी परीक्षा देणाऱ्याच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 10 हजारांनी वाढ झाली आहे. सीईटी परीक्षा झाल्यावर 1 नोव्हेंबर पासून कॉलेज सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असल्याच उदय सामंत यांनी सांगितलं.

राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य सीईटी सेलने आयोजित केलेल्या विविध सीईटीमध्ये जवळपास 10 लाख उमेदवार उपस्थित राहणे अपेक्षित आहे. अधिकृत वेबसाईटवर वेळापत्रक लवकरच ऑनलाइन जाहीर होण्याची शक्यता आहे. अभियांत्रिकी, कृषी, कायदा, एमबीए, आर्किटेक्चर इत्यादी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व उमेदवारांना परीक्षेच्या तारखांच्या ताज्या अपडेटसाठी cetcell.mahacet.org ला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. MHT CET Exam 2021 | Exam dates announced

MHT CET 2021 परीक्षा पॅटर्न
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र कॉमन एन्ट्रान्स टेस्ट परीक्षेच्या पॅटर्नसह अधिकृत परीक्षा पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य कॉमन एन्ट्रान्स टेस्ट सेलने पीसीएम व पीसीबी या दोन्ही गटांसाठी एमएचटी सीईटी 2021 चा परीक्षेचा पॅटर्न जाहीर केला आहे. याशिवाय परीक्षेत निगेटीव्ह मार्किंग सिस्टम लागू होणार नाही. परीक्षार्थींनी नोंद घ्यावी की सीईटीची गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचा पॅटर्न जेईई मेनच्यासारखा असेल. तसंच, जीवशास्त्र विषय असताना परीक्षेचा पॅटर्न नीटसारखा असेल. यासह एमएचटी सीईटी 2021 च्या पेपरमध्ये विचारले जाणारे प्रश्न प्रामुख्याने अॅप्लिकेशन बेस्ड असतील.

================================================================================================

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice