बीडराजकारण

लव लोचा ट्रॅंगल करुणा मुंडे परळी पत्रकार परिषद, अॅट्रॉसिटी, गावठी पिस्तुल

Karuna Sharma Munde Parli Press Conference and controversy

बीड  ः परळीत पत्रकार परिषद घेण्यासाठी आलेल्या करुणा मुंडे यांच्या कारमध्ये गावठी पिस्तुल सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. वैद्यनाथ मंदिर परिसरात आलेल्या करूणा मुंडे यांचा दर्शनासाठी आलेल्या महिलांशी वाद झाला. यावेळी काही महिलांनी करूणा मुंडे यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत पोलीसांकडे धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी पोलिसांनी करुणा मुंडे यांना पोलिस ठाण्यात नेले, यावेळी त्यांच्या गाडीची झडती घेतली असता पोलिंसना कारच्या मागच्या बाजूला गावठी पिस्तुल सापडले. पोलिसांनी ते जप्त केले असून या प्रकरणीही करुणा मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

परळीत पत्रकार परिषद घेण्यासाठी दाखल झालेल्या करुणा मुंडे यांना त्यांच्या मुलासह परळी पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. दोन दिवसांपुर्वी करुणा मुंडे यांनी सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल करत आपण परळीत सासरी येऊन अनेक गोष्टींचा पुराव्यानिशी खुलासा करणार असल्याचे जाहीर केले होते.  दुपारी बारा वाजता त्या पत्रकार परिषद घेणार होत्या. Karuna Sharma Munde Parli Press Conference and controversy

दुपारी दोन वाजता करूणा मुंडे आपल्या मुलासह परळीत दाखल झाल्या परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत स्थानबद्ध केले आहे. परळी पोलीस ठाण्यासमोर प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने जमा झाल्यामुळे परळीत सध्या तणावाचे वातावरण आहे. Karuna Sharma Munde Parli Press Conference and controversy

दरम्यान, वैद्यनाथ मंदिर परिसरात करूणा मुंडे यांच्यात आणि तिथे उपस्थित महिलांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. त्यानंतर काही महिलांनी करुणा मुंडे यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार केली. यावरून पोलिसांनी करुणा यांच्या विरोधात अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल केला. पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतांना पोलिसांनी करुणा यांच्या गाडीची झाडाझडती घेतली.

तेव्हा त्यांना गाडीत एक गावठी पिस्तुल आढळून आले. पोलिसांनी ते ताब्यात घेतले असून याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, करुणा यांच्या गाडीत गावठी पिस्तुल सापडल्याची माहिती पोलिस ठाण्याबाहेर जमलेल्या महिला व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना समजल्यावर जमाव संतप्त झाला. महिलांनी करुणा या मुंडे कुटुंबाचा घातपात करण्यासाठी आल्या होत्या, असा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. करुणा व त्यांचा मुलगा सध्या पोलिसांच्याच ताब्यात असून परळीमध्ये तणावाचे वातावरण आहे. Karuna Sharma Munde Parli Press Conference and controversy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Site Statistics
  • Today's visitors: 9
  • Today's page views: : 9
  • Total visitors : 504,606
  • Total page views: 531,365
Site Statistics
  • Today's visitors: 9
  • Today's page views: : 9
  • Total visitors : 504,606
  • Total page views: 531,365
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice