मराठा आरक्षणसमाजकारण

Maratha Reservation |आज मराठा आरक्षणप्रश्नी सरकार, विरोधक बैठकांचे सत्र,बैठक पेक्षा निर्णय महत्त्वाचे.

News Maharashtra Voice

मराठा आरक्षणप्रश्नी आज 2 महत्वाच्या बैठका पार पडणार आहेत. मराठा उपसमितीची एक बैठक सह्याद्री अतिथीगृहावर होणार तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी देखील या प्रकरणी बैठक बोलावली आहे. मराठा आरक्षणप्रश्नी रणनीती ठरवण्यासाठी भाजपची आज दुसरी बैठक, देवेंद्र फडणवीसांसह अन्य नेत्यांची उपस्थिती.

मराठा आरक्षणासंदर्भात छत्रपती संभाजीराजे मौन सोडणार; ट्विटरवरुन घोषणा

मराठा नेत्यांनी राज्यभरात मोर्चे काढण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे राज्य सरकारवर दबाव वाढायला सुरुवात झाली आहे | sambhaji raje Maratha Reservation

 मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापायला लागले असतानाच आता छत्रपती संभाजीराजे यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये संभाजीराजे यांनी आपण  मराठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्द्यावर लवकरच भूमिका मांडणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता संभाजीराजे आरक्षणासाठी सामोपचाराची का सरकारविरुद्ध एल्गार करण्याची भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (chhatrapati sambhaji raje will soon clear his stand about Maratha Reservation)

काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला देण्यात आलेले सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्दबादल ठरवले होते. न्यायालयाच्या निकालानंतर तात्काळ प्रतिक्रिया देतेवेळी संभाजीराजे यांनी सामोपचाराची भूमिका घेतली होती. केंद्र व राज्य सरकार दोघांनीही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. राज्य सरकारने प्रयत्नांमध्ये कुठेही कसर ठेवली नाही. त्यामुळे आता केंद्र व राज्य सरकारने मिळून यावर मार्ग काढावा, असे संभाजीराजे यांनी सुचविले होते.

मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण सातत्याने तापताना दिसत आहे. मराठा नेत्यांनी राज्यभरात मोर्चे काढण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे राज्य सरकारवर दबाव वाढायला सुरुवात झाली आहे. अशावेळी छत्रपती संभाजीराजे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Site Statistics
  • Today's visitors: 4
  • Today's page views: : 4
  • Total visitors : 504,601
  • Total page views: 531,360
Site Statistics
  • Today's visitors: 4
  • Today's page views: : 4
  • Total visitors : 504,601
  • Total page views: 531,360
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice