Maharashtra lockdown राज्यातील दुकानं आजपासून दुपारी चार वाजेपर्यंतच सुरु राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी पाचनंतर राज्यात संचारबंदी असेल. कोरोनाव्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे राज्यातील शहरं आणि जिल्ह्यांमधील निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
राज्यामध्ये कोरोनाची (Maharashtra Corona Update) आकडेवारी कमी झाल्यानंतर सरकारने पाच लेव्हलमध्ये निर्बंध शिथिल केले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर येत आहे. सोबतच राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय जारी केला आहे.
‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटमुळे महाराष्ट्रात निर्बंध ?
चीनमध्ये कोरोनाचा पहिला संसर्ग कधी झाला? ब्रिटनच्या संशोधकांनी दिली माहिती
कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंट काळजीचं कारण असल्याचं सरकारनं या नव्या आदेशात नमूद केलंय.
सरकारनं म्हटलंय,
या नव्या व्हेरियंटची प्रसार करण्याची क्षमता अधिक आहे.
त्यांचा फुप्फुसावर अधिक परिणाम होतोय.
या व्हायरसमुळे मोनोक्लोनल अँटीबॉडीच्या प्रतिसादात घट होतेय.
नवीन आदेशानुसार, आर-टीपीसीआर टेस्टच्या माध्यमातून मिळालेल्या आठवड्याचा पॉझिटीव्हीटी दर पाहून निर्बंध किती वाढवायचे याचा विचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
तसंच, ज्या-ज्या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती बिघडलेली असले तिथे थेट निर्बंध वाढवण्याचे निर्णय जिल्हा प्रशासनाने घ्यावेत यासाठी त्यांनी राज्य प्रशासनाच्या आदेशांची वाट पाहू नये, असंही म्हटलं आहे.
जिल्हा स्तरावर सूचना
आज जारी करण्यात आलेल्या आदेशांनुसार जिल्ह्यात किंवा महानगर पालिका क्षेत्रामध्ये निर्बंध शिथिल केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी पुढील उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पात्र नागरिकांपैकी 70 टक्के लसीकरण पूर्ण करण्यावर भर देण्यात यावी, यासाठी जनजागृती करावी.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट या पद्धतीचा अवलंब करणे.
हवेमधून पसरू शकणाऱ्या कोरोनाच्या प्रकारांना टाळण्यासाठी कार्यालयांच्या ठिकाणी हवेशीर वातावरण ठेवावं.
मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या RT-PCR चाचण्या करणे.
कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर दंड आकारणे.
गर्दी होईल असे कार्यक्रम किंवा घटना टाळणे.
कंटेनमेंट झोन तयार करताना ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, त्याच ठिकाणी निर्बंध लावता येतील, याचा विचार करावा.
हे ही लेख वाचा ——————–
- Kalmegh Ayurvedic Plant| कलमेघ बहुउद्देशीय आयुर्वेदिक वनस्पतीची ओळख; यकृत, अँटिऑक्सिडेंट, पचनशक्तीभारत हा वनौषधींच्या बाबतीत श्रीमंत देश मानला जातो. कलमेघ, एक बहुमुखी आयुर्वेदिक औषधी वनस्पती; यकृत,…
- उन्हाळ्यात हाडांच्या मजबूती साठी हे पदार्थ खा भरपूर कॅल्शियम मिळवागरमीच्या दिवसांत (Summer Health Tips) थंड पदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. काही पदार्थांच्या सेवनाने…
- Kalmegh | काळमेघ ओळख एका बहुपयोगी आयुर्वेदिक वनस्पतीची ; याकृत, अँटिऑक्सिडेंट, पाचनशक्तीभारत जड़ी-बूटियांच्या बाबतीत एक समृद्ध देश मानला जातो.Kalmegh, a versatile Ayurvedic herb; Liver, antioxidant, digestive…
- मण्यार ( COMMON KRAIT ) ओळख एका अत्यंत विषारी सापाची. नागापेक्षा 15 पटीने जहाल विषारी, अशियाखंडातला सर्वात विषारी साप.COMMON KRAIT Identification of a very poisonous snake. 15 times more venomous than a cobra,…
- Health Tips| पावसाळ्यात दही का खाऊ नये? जाणून घ्या काय म्हणतात तज्ञपावसाळ्यात आरोग्याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. हे हवामान जरी उष्णतेपासून दिलासा देण्याचे काम करते.…