नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित आघाडीने २८८ पैकी २३० जागा जिंकल्या होत्या. उद्या रविवारी महायुतीसरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून या निमित्त नागपूरला तयारीला वेग आला आहे. Maharashtra Cabinet : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या रविवारी १५ डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात होणार आहे. नवे मंत्री नागपुरातील विधीमंडळात मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीच्या तयारीला वेग आला आहे.Although a month passed after the result, the government’s clock did not settle; Now the time has come; Cabinet Extension Sub-Capital Nagpur
भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, सुमारे ३० मंत्री उद्या शपथ घेतील. राज्य विधिमंडळाचे आठवडाभराचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. ५ डिसेंबर रोजी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त ४३ सदस्य असू शकतात.
निवडून आलेले अनेक आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराचे उंबरे झिजवताना दिसत असून मंत्रीपद आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी अनेकेने प्रयत्न करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे मागच्या मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांना मंत्र पद देऊ नये यासाठी ह काही आमदार तिन्ही पक्षाच्या तिन्ही वरिष्ठ नेत्यांना शिफारस करीत आहे की गेल्या मंत्रिमंडळात असलेल्या या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येऊ नये.
निकाल लागून एक महिना पूर्ण होत असताना सुद्ध अजूनही या सरकारची घडी व्यवस्थित बसलेली दिसत नाहीये. दहा दिवस मुख्यमंत्री शपथविधीला लागले. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त सापडत नव्हता मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यावे यासाठी वरिष्ठ नेत्याला खूप माथापच्ची करावी लागली. यामध्ये मराठा ओबीसी आदिवासी एस सी एस टी अल्पसंख्याक विभागणी तसेच विभागीय व जिल्हानिहाय प्रतिनिधित्व देण्यासाठी समीकरण जुळवण्यासाठी प्रत्येक पक्षाची कसोटी लागलेली आहे.
मंत्रिमंडळात नेमकं कोणाला स्थान मिळणार अजूनही यादी आपल्या हाती लागलेली नाही आहे परंतु संध्याकाळपर्यंत नक्कीच आपल्या हाती कोणाला मंत्रिमंडळाची शपथ मिळणार आहे याचे धागेदुरे लागतील.