kareena Kapoor For Sita Role| तैमुर च्या अम्मीला सितामातेचा रोल नकोच.
Online Team – बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री करिना कपूर (bollywood actress kareena kapoor) रामायणातील सीतेची भूमिका (ramayana sita role) करणार अशी बातमी सगळीकडे पसरली आणि मोठ्या वादाला सुरुवात झाली. त्यावरुन अनेकांनी करिनाला ट्रोल करण्यास सुरुवात केलीय. गेल्या काही दिवसांपासून ती आणि सीतेची भूमिका या दोन्ही गोष्टी ट्रेडिंग आहेत. त्यामुळे येत्या काळात हा चित्रपट तयार होणार की नाही, त्याला होणारा विरोध वाढणार का असे प्रश्न आता सोशल मीडियातून विचारले जात आहेत. पौराणिक कथेवर आधारित चित्रपटात करिना सीतेची भूमिका करणार होती. त्यावरुन आता मोठ्या वादाला सुरुवात झाली आहे. (bajrang dal activists submit memorandum against kareena kapoor for sita role)
करिनानं त्या भूमिकेसाठी मोठ्य़ा रकमेची मागणी केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे मोठे प्रश्नही निर्माण झाले आहेत. दुसरीकडे नागपूर मधील बजरंग दलाच्या (bajrang dal) कार्यकर्त्यांनी करिनाच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारही केली आहे. दलाच्या कार्यकर्त्यांनी जे निवेदन दिले आहे त्यात करिनाला स्पष्ट शब्दांत सांगण्यात आले आहे, जर हा चित्रपट तयार झाला तर त्याला कडाडून विरोध करण्यात येईल. एका कार्यकर्त्यानं सांगितलं, सातत्यानं हिंदू समाजावर चित्रपट तयार करणं यातून नेमकं काय सांगायचं आहे ?
यापूर्वी तांडव (tandav) ही मालिका आली होती. त्यात हिंदू देवतांवर टीका करण्यात आली होती. त्यात करिना कपूरचा पती सैफ अली खान होता. आता सीता नावाचा चित्रपट येतो आहे. त्यात करिना प्रमुख भूमिकेत आहे. दरवेळी हे मुस्लिम समाजाचे लोक हिंदू समाजाच्या भावना का दुखावतात, असा प्रश्न त्यानं यावेळी केला आहे.
करिना गेल्या काही दिवसांपासून ट्रोल होताना दिसत आहे. काहींनी तिला ट्रोल करताना म्हटले होते, तु या रोलमध्ये फिट नाही. हा रोल एका हिंदू अभिनेत्रीला मिळायला हवा. त्यामुळे सोशल मीडियावर करिनाच्या विरोधात आता हॅशटॅगही सुरु झाला आहे.
————-हे ही वाचा—————
- सैय्यारा (2025): प्रेम, वेदना आणि विस्मरणाच्या प्रवासाची संगीतमय कथाSaiyyaraa (2025): A musical tale of a journey of love, pain and oblivion मुंबई | 2025:
- ठग लाइफ’ चित्रपटाच्या रिलीजमुळे सिनेरसिकांमध्ये उत्साह; कर्नाटकात बंदीमुळे वादमुंबई – ५ जून २०२५: तमिळ चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते कमल हासन आणि दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या बहुप्रतीक्षित
- ‘खालिद का शिवाजी’ – नेमका काय आहे चित्रपटसध्या देशभरात सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संदर्भांमध्ये जी अतिसंवेदनशीलता दिसून येते, त्या पार्श्वभूमीवर ‘खालिद का शिवाजी’
- “सितारे जमीन पर” – आमिर खानचा नवा चित्रपट : एक प्रेरणादायी प्रवासआमिर खान नेहमीच आपल्या वेगळ्या कथानकासाठी आणि संवेदनशील मांडणीसाठी ओळखला जातो. “तारे जमीन पर” (मराठीत: “सितारे
- कोण आहे “बाईईईई…काय प्रकार” बिग बॉस मराठी सीझन 5 गाजवणारी निक्की तांबोळी | Who is Nikki Tamboli Biographyनिक्की तांबोळी ही एक भारतीय अभिनेत्री आहे तिचा जन्म 21 ऑगस्ट 1996 एका हिंदू मराठी कुटुंबात

