शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा कारागृहातील मुक्काम वाढला न्यायालयाने जामीन फेटाळला

शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा कारागृहातील मुक्काम वाढला न्यायालयाने जामीन फेटाळला

Shah Rukh Khan’s son Aryan’s jail term extended, court rejects bail

क्रुझवरील अमलीपदार्थ प्रकरणात अटकेत असलेल्या सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा, आर्यनचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. विशेष न्यायालयाने आर्यन खानसोबत अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांचा जामीन फेटाळला आहे. आर्यनसह आरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा यांनीसुद्धा विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. एनसीबीने या अर्जाला तीव्र विरोध केला होता. Aryan’s stay in prison has increased. The special court has rejected the bail of Arbaaz Merchant and Moonmoon Dhamecha along with Aryan Khan. Along with Aryan, accused Arbaaz Merchant and Moonmoon Dhamecha had also applied for bail in the special court. The NCB had vehemently opposed the application. (Drugs On Case Aryan Khan’s jail term extended, bail denied)


न्यायालयाच्या सुनावणीआधी केंद्रीय अमलीपदार्थ विरोधी पथकाने (NCB) आर्यन आणि एका बॉलिवूड अभिनेत्रीदरम्यान ड्रग्ज संदर्भात झालेल्या चॅटिंगचे पुरावे न्यायालयासमोर सादर केले होते. २ ऑक्टोबर रोजी हे दोघं ड्रग्जसंदर्भात चॅट करत होते. याच दिवशी आर्यनसह इतर सात जणांना एनसीबीने ताब्यात घेतलं होतं. (Drugs On Case Aryan Khan’s jail term extended, bail denied)

आर्यन मागील सतरा दिवसांपासून कारागृहात आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांना त्याच्याकडे ड्रग्ज सापडले नाहीत, केवळ व्हॉटसप चॅटच्या आधारावर त्याच्यावर आरोप करण्यात आले आहेत, असा युक्तिवाद आर्यनच्या वतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई आणि सतीश मानेशिंदे यांनी केला होता. (Drugs On Case Aryan Khan’s jail term extended, bail denied)


तर एनसीबीच्या वतीने जामिनाला तीव्र विरोध करण्यात आला होता. आर्यन प्रभावशाली कुटुंबातील आहे आणि त्याला जामीन मंजूर झाला तर तपासात बाधा येऊ शकते, असा युक्तिवाद अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केला. तसेच आर्यनकडे काही सापडले नसले तरी त्याला अमली पदार्थ घ्यायचे होते आणि तो आंतरराष्ट्रीय तस्करांच्या संपर्कात होता असे गंभीर आरोप केले आहेत. (Drugs On Case Aryan Khan’s jail term extended, bail denied)

========================================================

<

Related posts

Leave a Comment