इसापूर धरणात 80.41 टक्के पाणीसाठा,पैनगंगा नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन

इसापूर धरणात 80.41 टक्के पाणीसाठा,पैनगंगा नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 27 :- इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणात पाण्याचा येवा होत आहे. त्यामुळे जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. शुक्रवार 26 ऑगस्टला इसापूर धरण 80.41 टक्के भरले आहे. संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता जिवीत व वित्त हानी होऊ नये म्हणून पैनगंगा नदीकाठच्या दोन्ही तिरावरील गावातील नागरिकांनी आपली जनावरे, घरगुती व शेती उपयोगी वस्तूसह स्वत: सुरक्षित स्थळी रहावे, असे आवाहन नांदेडचे उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 कार्यकारी अभियंता पी. एल. भालेराव यांनी केले आहे. 80.41 percent water storage level in Isapur dam overful

इसापूर धरणाची पाणी पातळी 438.92 मी. एवढी असून इसापूर धरणाचा जलाशय प्रचलन आराखडा मंजूर आहे. पाण्याचा येवा पाहता इसापूर धरणाचा मंजूर जलाशय प्रचलन आराखडा (आरओएस) (90 टक्के विश्वासाहर्ता) नुसार 31 ऑगस्ट पर्यंत 440.82 मी. ठेवावी लागणार आहे. धरण सुरक्षिततेच्यादृष्टिने इसापूर धरणातून वक्रदारद्वारे कोणत्याही क्षणी धरणात येणारे अतिरिक्त पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडवे लागेल. यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन पुरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे कार्यकारी अभियंता पी. एल. भालेराव यांनी कळविले आहे.

As it is raining in the catchment area of ​​Isapur dam, water is flowing in the dam. As a result, the water level in the reservoir is increasing. On Friday, August 26, the Isapur dam is 80.41 per cent full. Citizens of villages on both the banks of the Panganga river should keep their animals, household and agricultural utensils in a safe place to avoid any loss of life and property in view of the possible flood situation. 1 Executive Engineer p. L. Bhalerao has done.

The water level of Isapur Dam is 438.92 m. The reservoir operation plan of Isapur dam has been approved. As per the approved Reservoir Operation Plan (ROS) (90 per cent reliability) of Isapur Dam, 440.82 m. Have to keep. For the safety of the dam, the excess water coming into the dam at any moment through the curve from the Isapur dam will have to be discharged into the Panganga river basin. This will not rule out the possibility of a catastrophic flood with a large rise in the water level in the river basin, said Executive Engineer P.S. L. Reported by Bhalerao.

==========================================================================================

Related posts

Leave a Comment