Elections should not be held without OBC reservation, Legislature approves resolution: Chhagan Bhujbal
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला २२ डिसेंबरपासून सुरुवात झाली असून २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. हे अधिवेशन दरवर्षी नागपुरला होते परंतु यंदा ते मुंबईत होत आहे. तसेच नेहमीप्रमाणे यंदाच्याही हिवाळी अधिवेशनाची सुरुवात तापलेल्या वातावरणाने झाली आहे. असे असतांनाच ओबीसी आरक्षणा संदर्भात विधिमंडळात महत्वाचा ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(chhagan Bhujbal) यांनी दिली आहे. (Elections should not be held without OBC reservation, Legislature approves resolution: Chhagan Bhujbal)
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना भुजबळ यांनी सांगितले की,’ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत आणि तशा पद्धतीने निवडणूक आयोगाला माहिती देण्यात यावी, असा एक ठराव विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्या संगनमताने सभागृहात मंजूर केला आहे.’ तसेच यासंदर्भातला सर्वपक्षीय ठराव आज(२७ डिसें.) सभागृहात घेण्यात येणार असल्याचेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले. (Elections should not be held without OBC reservation, Legislature approves resolution: Chhagan Bhujbal)
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’ओबीसी आरक्षण संदर्भात केंद्र सरकारने फेरविचार याचिका दाखल केली असून यात महाराष्ट्र सरकारच्या बाबतीत जो निर्णय देण्यात आला आहे, त्याबद्दल आम्ही वकिलाचा सल्ला घेत आहोत. शिवाय केंद्र सरकारच्या या याचिकेला साथ देण्यासाठी आम्हीही सामील होणार आहोत’, असेही भुजबळ म्हणाले. (Elections should not be held without OBC reservation, Legislature approves resolution: Chhagan Bhujbal)
महत्त्वाच्या बातम्या
- Maharashtra Assembly Election 2024 | मोदीजी जो निर्णय घेतील तो मान्य असेल. मुख्यमंत्रीपदापासून एकनाथ शिंदेंची माघार की मजबुरी?
- लाडके भाऊच पुन्हा सत्तेवर, महायुती 230 जागा जिंकून प्रचंड बहुमतात विजयी..
- हा हिंदूत फुट पाडणारा राक्षस; कालीचरण महाराजांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टिका
- Maharashtra Assembly Elections -2024 प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी 5 वाजल्यापासून थंडावल्या.
- बाभळीच्या शेंगा हे आयुर्वेदातील एक महत्त्वाचे औषध; जाणून घ्या फायदे |Acacia pods are an important medicine in Ayurveda; Know the benefits