Covid-19 फुफ्फुस संसर्गावर Coronavirus रेमडेसिव्हिर प्रभावी, शास्त्रज्ञकडून वापरावर झाले शिक्कामोर्तब!

Covid-19 फुफ्फुस संसर्गावर Coronavirus रेमडेसिव्हिर प्रभावी, शास्त्रज्ञकडून वापरावर झाले शिक्कामोर्तब!

कोरोना विषाणूने (Coronavirus) बाधित फुफ्फुसांना (Lungs) सक्षम करण्यासाठी ‘रेमडेसिव्हिर’ (Remdesivir) प्रभावी ठरत असल्याचे प्रयोगशाळेत (Laboratory) सिद्ध करण्यात आले आहे. विशेष म्हणजे रेमडेसिव्हिरच्या परिणामकारकतेवर अशा प्रकारे शिक्कामोर्तब करणाऱ्या व्यक्तींपैकी एक व्यक्ती ही मराठी महिला शास्त्रज्ञ (Women Scientist) आहे. अमेरिकेतील लॉस एंजलिस शहरात ‘सिडर्स सायनाय मेडिकल सेंटर’मध्ये कार्यरत डॉ. अपूर्वा मुळे (Dr Apurva Mule) यांनी हे संशोधन केले आहे. (Use of Remedesivir was Sanctioned)

अत्यवस्थ रुग्णांच्या (क्रिटिकल) उपचारासाठी रेमडेसिव्हिरचा वापर करण्यात येतो. नुकतेच ‘सेल रिपोर्ट्स’ या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत यासंबंधी डॉ. मुळे यांचे संशोधन प्रकाशित झाले आहे. सार्स कोव्हिड -२ हा विषाणू रक्तात ऑक्सिजन पाठविणाऱ्या फुफ्फुसातील भागावरच हल्ला करत असल्याचेही या संशोधनातून पुढे आले आहे. डॉ. मुळे यांच्यासोबतच डॉ. बॅरी स्ट्रिप यांटा संशोधनात सहभाग आहे. मूळच्या पुण्याच्या असलेल्या डॉ. मुळे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून जैवतंत्रज्ञान विषयात पदवीचे शिक्षण घेतले आहे. ब्रिटनच्या शेफिल्ड विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण व पीएचडी पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेत पोस्टडॉक पूर्ण केले आहे.

<

Related posts

Leave a Comment