Ch. Shahu Maharaj | स्वराज्य विस्तारक भारतवर्ष मराठा साम्राज्य नृपती शंभूपुत्र छत्रपती शाहू महाराज

Ch. Shahu Maharaj | स्वराज्य विस्तारक भारतवर्ष मराठा साम्राज्य नृपती शंभूपुत्र छत्रपती शाहू महाराज

शत्रुलाही ज्यांचे कौतुक करण्यावाचून राहवले नाही,असे मराठ्यांचे सर्वात ताकदवर छत्रपती,’थोरले शाहू महाराज’.

“म्हणो लागले मोगलाईत बंदगानअली होते.मऱ्हाट राज्यात शाहू राजे होते.यैसे माणूस पुढे होणार नाहीत.सर्व राज्य स्वामिस सोपून गेले.छत्रपतीसारखा राजा होणे नाही.राज्ये बरे नांदविले. अजातशत्रू होते.” – निजामउलमुकचा नातू मुजफ्फरजंग.

“सर्व शुरांत श्रेष्ठ,सर्व उमरावांत थोर.” – बहादूरशाह.

“सुश्रेष्ठ,फरमावरदारी के इरादों मे पक्के राजा शाहू” – नसरतजंग

“हिंदुस्थान चालविण्यास हिंदुपती शाहू हेच योग्य व्यक्ती आहेत.” – इराणचा बादशाह नादिरशाह

“1749 साली जेव्हा शाहुजींचा मृत्यू झाला,तेव्हा मराठ्यांचे साम्राज्य पश्चिमी समुद्रापासून ते ओडिशापर्यंत, आग्रा पासून कर्नाटकापर्यंत आणि जवळ जवळ संपूर्ण हिंदुस्थानावर पसरले होते.ते प्रत्येक युद्ध आणि राजकीय निर्णयामध्ये अग्रेसर-प्रभावी असल्याचे दिसून येत होते.” – Memoir of Hindostan या तत्कालीन युरोपियन मासिकात करण्यात आलेले शाहू छत्रपतींचे वर्णन.

18 व्या शतकात आशिया खंडातील सर्वात ताकदवान असणाऱ्या या सम्राटाने आपल्या पराक्रमी आजोबांविषयी मात्र निष्ठा कधीही कमी होऊ दिली नाही.शाहू छत्रपती म्हणतात,
“थोरले छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद व त्यांचे पायाचा प्रताप त्यांनीच इतके रक्षण करून हे दिवस दाखवले.”

आणि आपल्या या पराक्रमी सम्राटाला भेट म्हणून अवघा हिंदुस्थान देण्याची मराठ्यांची भावना होती.
“संपूर्ण हिंदुस्थान जिंकून छत्रपती स्वामींचे चरणी ठेवला तरी काळ अनुकूल आहे”

भारतवर्षसम्राट छत्रपती थोरले शाहू छत्रपतींचा विजय असो.

<

Related posts

Leave a Comment