मुंबई: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीची परीक्षा रद्द (HSC Exam) करण्यासाठी सावध भूमिका घेतली आहे. या परीक्षेत विरोधात कोणी न्यायालयात जाऊ नये म्हणून त्यासंदर्भातील घोषणा करण्यापूर्वी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे यासाठीचा प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आपत्ती व्यवस्थापनाचा प्रस्ताव आल्यानंतर राज्यात बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला जाणार आहे. (state education minister varsha gaikwad cautious approach before declaring cancellation of hsc exam)
आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना बारावीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभाग आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे प्रस्ताव सादर करणार असून त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
- कोण आहे “बाईईईई…काय प्रकार” बिग बॉस मराठी सीझन 5 गाजवणारी निक्की तांबोळी | Who is Nikki Tamboli Biography
- Big Boss -5 Marathi गाजवणारा गुलीगत धोका बुक्कीत टेंगूळ सुरज चव्हाण कोण आहे?
- सुनीता विल्यमला परत आणण्यासाठी NASA SpaceX Crew-9 लाँचिंग पुन्हा लांबणीवर?
- मनोज जरांगे यांचे नऊ दिवसांपासून चालु असलेले उपोषण थांबवले; आचारसंहिता पर्यंत सरकारला वेळ
- Badlapur sexual assault accused Akshay Shinde police encounter | बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस एन्काउंटर
त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बालकांना जास्त प्रादुर्भावाची भिती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात असल्याने ही परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मंगळवारी सीबीएसईची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील केंद्र आणि राज्य सरकारच्या भूमिकांमध्ये सूसूत्रता असायला हवी अशी भूमिका घेतली आहे.
ही सर्व माहिती आजच्या बैठकीत सर्वांसमोर मांडल्याचे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेलाच राज्य सरकारचे प्राधान्य असून आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर परीक्षेसंदर्भात निर्णय जाहीर करण्यात येईल, असे देखील वर्षा गायकवाड यांनी सांगितले.