Ajit Pawar Rebel| यामुळे अजित पवार ‘देवेंद्रवासी’ झाले | Ajit Pawar supports Shinde Fadnavis government due to this

अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडला आहे. Ajit Pawar Rebel घडला म्हणण्यापेक्षा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी तो घडवून आणला, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. 2019 साली जनमत देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने असताना शरद पवार यांनी कटकारस्थान करून त्यांना सत्तेपासून दूर ठेवले, त्यांची िंटगलटवाळी केली, आपणच राज्यातल्या राजकारणातील ‘चाणक्य’ आहोत, ‘जाणते’ आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. पण, आधी उद्धव ठाकरेंचा शिवसेना हा पक्ष फोडून आणि आता पावसात भिजलेल्या काकांचा पक्ष फोडून देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष कृतीने हे सिद्ध केले आहे की, तेच राज्यातल्या राजकारणातील ‘निर्विवाद बॉस’ आहेत. Ajit Pawar supports Shinde Fadnavis government due to this

1978 साली वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून पुलोद चा प्रयोग करून नवीन सरकार बनवत मुख्यमंत्री झाले आज त्याच पवारांच्या पाठीत त्यांच्या सख्ख्या पुतण्याने आणि विश्वासू सहकार्‍यांनीच खंजीर खुपसला, याला नियतीचा खेळच म्हणावा लागेल. अजित पवारांनी बंड करून पक्ष आणि घड्याळ या चिन्हावरही दावा सांगितला असल्याने, जी स्थिती उद्धव ठाकरे यांची झाली तशीच आता शरद पवारांची होणार आहे. करावे तसे भरावे, या उक्तीची प्रचीती शरद पवार यांना घ्यावीच लागेल. त्यापासून त्यांची सुटका नाही. खरे तर वय लक्षात घेता त्यांनी आता राजकारणात सक्रिय राहण्याऐवजी विश्रांती घ्यायला पाहिजे. पण, त्यांना मोह आवरेनासा झाला असल्याने आजवर जे कमावले आहे, ते उतार वयात घालवतील की काय, अशी शंका वाटायला लागली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येत अजित पवार यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि राजकारणात खळबळ उडाली. काल रविवार होता. दुपारची वेळ होती. लोक सुटीच्या मूडमध्ये होते. त्यातच अजित पवारांच्या बंडाची बातमी येऊन धडकली आणि जनमानस खडबडून जागे झ्राले. जे घडले, त्यामुळे अनेकांना धक्का बसला. काहींना सुखद, तर काहींसाठी हा दु:खद धक्का होता. यावेळी शपथ घेण्यासाठी एकटे अजित पवार नव्हते, तर त्यांच्यासोबत भुजबळ, वळसे पाटील यांच्यासह अन्य आठ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. पहाटेच्या शपथविधीनंतर जे घडले, तसे यावेळी घडू नये याची पुरेपूर काळजी घेऊनच अजित पवार राष्ट्रवादीतील 40 पेक्षा जास्त आमदारांना घेऊन ‘देवेंद्रवासी’ झाले. यावेळचे बंड हे विचारपूर्वक नियोजन करून करण्यात आले, हे अजितदादांसोबत असलेल्या संख्याबळावरून आणि सोबत आलेल्या नेत्यांवरून स्पष्ट झाले आहे.

विधान परिषदेतील सहा आमदारही अजितदादांसोबत आहेत आणि प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू नेते व लोकसभेचे सदस्य, पक्षाचे खजिनदार सुनील तटकरे हेही दादांसोबत आल्याचे सगळ्यांनी पाहिले आहे. राष्ट्रवादीचे 40 पेक्षा जास्त आमदार यावेळी अजित पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे यावेळचे बंड हे मजबूत असून राज्यातील राजकारणात उलटफेर घडविण्याची फडणवीसांची क्षमताही पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. कालचा पोरगा म्हणून फडणवीसांवर टीका करणार्‍या सगळ्यांची तोंडे बंद झाली आहेत.

प्रफुल्ल पटेल हे अत्यंत विश्वासू सहकारी बंडात सामील झाल्याने शरद पवार दु:खी झाल्याचे सगळ्यांनी पाहिले. पण, जे दु:ख पवारांनी वसंतदादांना दिले होते, तेच आज उतारवयात त्यांच्या वाट्याला आले, हे नैसर्गिक आहे. हे दु:ख पचविण्याची पवारांची क्षमता किती, हे येणार्‍या काळात दिसेल…

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice