जिल्हा जिल्हा परिषद शाळा व कस्तुरबा गांधी विद्यालयात शिक्षण घेऊन दहावी उत्तीर्ण होणाऱ्या 30 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना दोन वर्षे मोफत निवासी JEE, NEET, IIT चे मार्गदर्शन दिले जाणार आहे यासाठी घेतल्या जाणाऱ्या सुपर थर्टी परीक्षेसाठी 982 मुलांचे ऑनलाईन अर्ज दाखल झाले असून मंगळवारी जालना शहरातील चार केंद्रावर सकाळी 11 ते दुपारी एक या वेळेत ही परीक्षा घेतली जाणार आहे. Experiment of Super Thirty for Medical, Engineering Entrance Exam Preparation after 10th in ZP Jalna District
शेतकरी कष्टकऱ्यांसह सर्वसामान्य कुटुंबातील मुला-मुलींना जिल्हा परिषद शाळा कस्तुरबा गांधी विद्यालयात शिक्षण घेतात या मुला मुलींना दहावीनंतर गुणवत्ता असतानाही केवळ आर्थिक अडचणीमुळे JEE, NEET, IIT ची तयारी करता येत नाही ही बाब लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा मीना यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊन दहावी उत्तीर्ण होणाऱ्या मुलांना मोफत निवासी JEE, NEET, IIT मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते याद्वारे अर्जावर 982 मुलांनी रजिस्ट्रेशन केले आहे जिल्ह्यातील चार परीक्षा केंद्रावर मंगळवारी 13 जून रोजी ही परीक्षा घेतल्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यात अंबड भोकरदन तालुक्यातील 276 विद्यार्थ्यांसाठी जालना येथील सी टी एम के गुजराती हायस्कूल, जालना बदनापुर तालुक्यातील ३०८ मुलांसाठी एम एस जैन माध्यमिक विद्यालय जालना, जाफराबाद परतुर येथील 337 विद्यार्थ्यांसाठी सरस्वती भुवन प्रशाला आणि घनसांगी मंठा तालुक्यातील 161 विद्यार्थ्यांसाठी जालना येथील जिल्हा परिषद प्रा शाळा परीक्षा येथ घेतली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे दरम्यान या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल घटकातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध संधी मिळणार मिळतील असा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे. Experiment of Super Thirty for Medical, Engineering Entrance Exam Preparation after 10th in Jalna District
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी सांगितले की, जिल्हा परिषद कस्तुरबा गांधी विद्यालयातून दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलांना दोन वर्ष मोफत JEE, NIT, IIT मार्गदर्शन देणार आहे यासाठी सुपर थर्टी परीक्षा घेतली जाणार असून परीक्षार्थींनी मनात कोणताही भीती न बाळगता ही परीक्षा द्यावी परीक्षेची पूर्ण तयारी झालेली आहे.