धार्मीक

ब्राह्मण असल्याचा बुद्धीजिवी असल्याचा गर्व आहे – अमृता फडणवीस 

नाशिक : ब्राह्मण महासंघ जात- धर्म, पंथ बाजूला ठेऊन अनेकांसाठी झटतो. लोकांमध्ये जाऊन त्यांच्या इच्छा-आकांक्षा समजून घेतो. ब्राह्मण असल्याचा गर्व आहे, परंतु आम्हाला आमची मार्केटिंग करता येत नाही., असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलं.अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघातर्फे ‘दीपावली स्नेहमिलन 2022’ कार्यक्रम नाशिक येथे झाला. या कार्यक्रमात त्या बोलता होत्या. Amrita Fadnavis is proud to be a Brahmin and an intellectual

https://youtu.be/nmHRf74U370

प्रभू श्रीरामाचे नाशिकला चरण लागले. या नगरीत येऊन मला धन्य वाटते आहे. याच पंचवटीत गेल्या बारा वर्षांपासून समाजाच्या इमारतीचे बांधकाम रखडले आहे. त्या कामाची जबाबदारी डॉ. भारती पवार यांच्यासह स्थानिक आमदार यांच्यावर सोपवते. नेशन फर्स्ट हे आपले ब्रीद असल्याने, शुक्ल यजुर्वेद संस्थेची इमारत उभी करण्यासाठी कोण मध्ये येतो ते मी बघते. जे अधिकारी हे काम थांबवत आहेत त्यांची नावे मला कळवा मी पुढे बघते, असा दमही अमृता फडणवीसांनी यावेळी भरला.

महत्त्वाच्या —-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Site Statistics
  • Today's visitors: 19
  • Today's page views: : 19
  • Total visitors : 512,664
  • Total page views: 539,571
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice