प्रत्येक शाळेने Let’s change या स्वच्छता उपक्रमात सहभागी व्हावे – मा.रोहीत आर्या, राज्य संचालक, Let’s Change

प्रत्येक शाळेने Let’s change या स्वच्छता उपक्रमात सहभागी व्हावे – मा.रोहीत आर्या, राज्य संचालक, Let’s Change

प्रत्येक शाळेने Let's change या स्वच्छता उपक्रमात सहभागी व्हावे - मा.रोहीत आर्या, राज्य संचालक, Let's Change /जालना

आज दि. 08 नोव्हेंबर 2022 रोजी मा. रोहीत आर्या, राज्य संचालक, Let’s change हे आज जालना दौर्‍यावर होते, त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनात जि.प.प्रशाला जालना येथे मुख्याध्यापकांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. प्रसंगी जालना तालुक्यातील 132 मुख्याध्यापक उपस्थित होते. प्रसंगी मा. उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांनी सर्व मुख्याध्यापकांना या उपक्रमात सहभाग घेण्याविषयक प्रेरित केले. Every school should participate in Let’s Change Cleanliness Initiative – Mr. Rohit Arya, State Director, Let’s Change / Jalna

यावेळेस मा. रोहीत आर्या त्यांनी असे प्रतिपादन केले की, 19 नोव्हेंबर 2022 पर्यंत 5 वी ते 8 वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी लोकांना बेफिकीरपणे कचरा फेकण्यापासून रोखण्यासाठी ‘monitor’ करावेत. कधीही आणि कुठेही कोणी कचरा टाकताना दिसल्यास ‘मॉनिटर’ नम्रपणे त्यांची चूक निदर्शनास आणून ती चूक सुधारण्यास कचरा कचराकुंडीत टाकावयास विनंती करतील.

असे केल्यावर येणारे अनुभव / घटनेचे संक्षिप्त विवरण विद्यार्थी किंवा पालक सोशल मीडियावर (फेसबुक किंवा इंस्टाग्राम किंवा ट्विटर) विद्यार्थ्यांच्या फोटोसह, शाळेचे नाव, जिल्हा जालना आणि #swachhtamonitor #Jalna आणि @swachhtamonitor जोडून शेअर करावेत. पालकांना सोशल मीडियावर शेअर करणे शक्य नसल्यास, विद्यार्थ्याने लोकांना कचरा टाकण्यापासून थांबवण्याच्या वेगवेगळ्या अनुभवांचे / घटनेचे एक छोटे वर्णन लिहून सबमिट करावे. निवडलेल्या सर्वाधिक सक्रिय विद्यार्थ्यांना जिल्ह्याचा “स्वच्छता मॉनिटर” बनण्यासाठी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.

कचऱ्या बाबतीतल्या निष्काळजीपणावर नियंत्रण आणि निर्मूलन करण्यासाठी सक्रिय #स्वच्छतामोनिटर होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक यांनी पुढाकार घेण्याबाबत त्यांनी आवाहन केले.
यावेळेस Let’s change राज्य सह संचालक खंडू सदाफुले, गटशिक्षणाधिकारी गीता नाकाडे, प्रकाश कुंडलकर, मुख्याध्यापक, Let’s change जिल्हा समन्वयक श्रीकृष्ण निहाळ, गटसमन्वयक पी.आर.जाधव, जालना तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. Every school should participate in Let’s Change Cleanliness Initiative – Mr. Rohit Arya, State Director, Let’s Change / Jalna

पाणचक्की Panchakki संभाजीनगर औरंगाबाद शहरातील इ स 1744 शतका मधील इंजिनिअरिंग चा एक आजूबा |shivprasth

Read this —-

अनुसाया मंदिर माहुर भगवान दत्तात्रय यांची माता संपूर्ण दर्शन | Mahurgad | Maharashtra | shivprasth
<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice