भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल! राहुल गांधींची कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल! राहुल गांधींची कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा
https://youtu.be/mYdbcx5MiQ8
राहुल गांधीची भारत जोडो महाराष्ट्रात दाखल शिवरायाचे अभिवादन संबोधन

Bharat Jodo Yatra entered in Maharashtra! Rahul Gandhi’s walk from Kanyakumari to Kashmir

मुंबई – काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झालीय. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन राहुल गांधींनी नांदेडच्या देगलूर येथे महाराष्ट्रातील पहिली सभा घेतली. राहुल गांधींची ही यात्रा कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर अशी आहे. ही यात्रा महाराष्ट्रात पुढचे दिवस असणार आहे. त्यांनी आज नांदेडमधील गुरुद्वारमध्ये जाऊन दर्शन घेतलं. राहुल गांधींची 18 नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव येथे जाहीर सभा होईल. Bharat Jodo Yatra entered in Maharashtra! Rahul Gandhi’s walk from Kanyakumari to Kashmir

राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ (Bharat Jodo Yatra) सोमवारी रात्री महाराष्ट्रात दाखल झाली. सोमवारी रात्री तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे ही यात्रा पोहोचली. यावेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) मशाल घेऊन पुढे सरसावले. भारत जोडो यात्रा 18 दिवसांच्या मुक्कामात राज्यातील 15 विधानसभा मतदारसंघ आणि सहा लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे. ही यात्रा मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागातून जाणार आहे. दरम्यान, राहुल गांधी महाराष्ट्रात दोन जाहीर सभांनाही संबोधित करणार आहेत. Bharat Jodo Yatra entered in Maharashtra! Rahul Gandhi’s walk from Kanyakumari to Kashmir

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दक्षिणेतील कन्याकुमारी येथून सुरू झालेली भारत जोडी यात्रा महाराष्ट्रात एकूण 18 दिवस चालणार आहे. 7 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान राहुल गांधी पाच जिल्ह्यांमध्ये पदयात्रा काढणार आहेत. या दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी 7 ते 11 नोव्हेंबर या कालावधीत नांदेड जिल्ह्यात असतील, त्यानंतर ते 11 ते 15 नोव्हेंबरपर्यंत वाशिम जिल्ह्यात राहणार आहेत.

https://youtu.be/QjsIjPWENn8
telngana bharat jodo video

महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी या यात्रेने 7 सप्टेंबर रोजी दक्षिणेतील कन्याकुमारी येथून सुरू झालेली ही पदयात्रा 61 व्या दिवशी महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये दाखल झाली. यात्रेतील सहभागींसाठी देगलूर येथील कलामंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. स्वागत समारंभानंतर सोमवारी रात्री यात्रेला पुन्हा सुरुवात झाली असून त्यात कार्यकर्ते  ‘एकता मशाल’ घेऊन जाणार आहेत. Bharat Jodo Yatra entered in Maharashtra! Rahul Gandhi’s walk from Kanyakumari to Kashmir

https://youtu.be/jJ2v6bhc0C4
सफर देवगिरी (दौलताबाद) किल्लाची Devgiri Fort Part -1
https://youtu.be/SQWGJVIaL60
सफर देवगिरी (दौलताबाद) किल्लाची Devgiri Fort Part -2

<

Related posts

Leave a Comment