जिल्‍हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची 28 जुलै रोजी आरक्षण सोडत

जिल्‍हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची 28 जुलै रोजी आरक्षण सोडत

नांदेड : मा. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नांदेड जिल्हा परिषद सदस्य पदासाठी आरक्षणाची सोडत सुधारित कार्यक्रमानुसार गुरुवार २८ जुलै २०२२ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथील प्रेक्षागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात येणार आहे, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य) नांदेड यांनी कळविले आहे. 

तसेच जिल्ह्यातील किनवट, हदगाव, नांदेड, भोकर, धर्माबाद, बिलोली, कंधार व देगलूर या तालुका मुख्यालयी  गुरुवार २८ जुलै २०२२ रोजी सकाळी ११ वाजता  व तालुका माहूर , हिमायतनगर, अर्धापूर, मुदखेड, उमरी, नायगांव (खै), लोहा व मुखेड येथे २८ जुलै रोजी दुपारी ०४ वाजता संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांचेकडून संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्या नियंत्रणात पंचायत समिती सदस्य पदांसाठीच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. संबंधितानी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील पंचायत समिती सदस्‍य पदांसाठीच्‍या आरक्षणाची सोडत तालुकापातळीवर काढण्यात येत आहे. गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. किनवट, हदगाव, नांदेड, भोकर, धर्माबाद, बिलोली, कंधार व देगलूर तालुका मुख्‍यालयी तर माहूर, हिमायतनगर, अर्धापूर, मुदखेड, उमरी, नायगाव (खै), लोहा व मुखेड या तालुक्यांसाठी 28 जुलै रोजीच दुपारी 4 वाजता संबधित तहसिलदार यांच्याकडून संबधीत उपविभागीय अधिकारी यांच्‍या नियंत्रणात पंचायत समिती सदस्‍य पदांसाठीच्‍या आरक्षणाची सोडत काढण्‍यात येणार आहे. जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या नागरिकांना या सभेस उपस्थित राहण्याची इच्छा आहे त्यांनी नमूद ठिकाणी व वेळी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी

नांदेड जिल्‍हा परिषद व जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करण्‍याचा दिनांक 29 जुलै 2022 आहे. तर आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्‍हा परिषद आरक्षण / संबंधित तहसिलदार यांच्याकडे पंचायत समिती आरक्षणाबाबत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी 29 जुलै ते 2 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, 1961 मधील कलम 12 उपकलम (1), कलम 58 (1)(अ) प्रमाणे व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम, 1996 नुसार अनुक्रमे जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिलाकरीता राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत.

सोडतीचे ठिकाण व वेळ

जिल्‍हा परिषद / पंचायत समितीचे नाव सभेची वेळ व तारीख, सभेचे ठिकाण पुढीलप्रमाणे आहे. नांदेड जिल्‍हा परिषदेसाठी गुरुवार 28 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. शंकरराव चव्‍हाण नियोजन भव‍न जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे. माहूर पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी दुपारी 4 वा. पंचायत समिती सभागृह माहूर येथे. किनवट पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. पंचायत समिती सभागृह किनवट येथे. हिमायतनगर पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी दुपारी 4 वा. पंचायत समिती सभागृह हिमायतनगर येथे. हदगाव पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. पंचायत समिती सभागृह हदगाव येथे. अर्धापूर पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी दुपारी 4 वा. तहसिल कार्यालय सभागृह अर्धापूर येथे. नांदेड पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. उपविभागीय अधिकारी कार्यालय बैठक हॉल नांदेड येथे. मुदखेड पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी दुपारी 4 वा. तहसिल कार्यालय मुदखेड येथे. भोकर पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. पंचायत समिती सभागृह भोकर येथे. उमरी पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी दुपारी 4 वा. पंचायत समिती सभागृह उमरी येथे. धर्माबाद पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. नगरपरिषद सभागृह धर्माबाद येथे. बिलोली पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. पंचायत समिती सभागृह बिलोली येथे. नायगाव खै. पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी दुपारी 4 वा. कै. बळवंतराव चव्हाण पंचायत समिती सभागृह नायगाव खै. येथे. लोहा पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी दुपारी 4 वा. सभागृह तहसिल कार्यालय लोहा येथे. कंधार पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. पंचायत समिती सभागृह कंधार येथे. मुखेड पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी दुपारी 4 वा. बैठक हॉल तहसिल कार्यालय मुखेड येथे. देगलूर पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. शंकरराव चव्हाण सभागृह पंचायत समिती देगलूर येथे आयोजित करण्यात आली आहे.

<

Related posts

Leave a Comment